वसतिगृहाबाहेर राहून शिक्षण घेणाऱ्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी स्वयंम योजना अर्ज करण्याचे आदिवासी विकास विभागाचे आवाहन
जळगाव – विभागीय व जिल्हास्तरावर इयत्ता १२ वी नंतर पुढे शिक्षण घेणाऱ्या मात्र वसतीगृहात प्रवेश न मिळालेल्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यासाठी पंडीत दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन यावल एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी अरूण पवार यांनी केले आहे.
सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात पंडीत दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेसाठी नविन ऑनलाईन फॉर्म भरणा-या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थी/विद्यार्थीनींनी www.swayam. mahaonline.gov.in या वसतीगृहाच्या ऑनलाईन संकेतस्थळावर विद्यार्थ्यांनी अगोदर ऑनलाईन फॉर्म भरावयाचा आहे. त्यानंतर सदरचा फॉर्म पंडीत दिनदयाल योजनेकडे ऑनलाईन वर्ग होईल. ही योजना तालुकास्तरावरील सर्व मान्यताप्राप्त तंत्रशिक्षण तसेच व्यवसाय शिक्षण अभ्यासक्रमाच्या शासकीय तसेच अनुदानित महाविद्यालयामध्ये केंद्रीभूत प्रक्रियाव्दारे प्रवेश घेवून शिक्षण घेणा-या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी लागू आहे.
सन २०२२-२०२३ या शैक्षणिक वर्षांपासून योजनेत प्रवेशित आहे अश्या सर्व विद्यार्थीनी देखील सन २०१३-२०१४ या शैक्षणिक वर्षांत देखील (जूने विद्यार्थी म्हणून) Renew Application मध्ये अर्ज भरणे आवश्यक आहे. नविन विद्यार्थ्याना सदर संकेतस्थळावर अर्ज भरण्याकरीता प्रथम नोंदणी (registration) करावे. नावनोंदणी प्राप्त युझर आयडी व पासवर्डचा उपयोग करुन ऑनलाईन अर्ज भरावा. योजनेमध्ये अर्ज भरण्यासाठी Hostel Addmission हा पर्याय निवडून काळजीपूर्वक ऑनलाईन अर्ज भरावा.
या योजनेसाठी अर्ज करतांना ऑनलाईन प्रणालीमध्ये अपलोड करण्यासाठी आवश्यक सर्व कागदपत्रे (उदा. मागील शैक्षणिक वर्षात मिळालेले गुणपत्रक / जात प्रमाणपत्र / जात वैधता प्रमाणपत्र (व्यवसायिक अभ्यासक्रमासाठी)/ वडिलांचा चालू वर्षाचा उत्पन्नाचा दाखला/शाळा सोडल्याचा दाखला/ चालू वर्षी प्रवेश घेतलेल्या शाळा/ महाविद्यालयाचे कॅप राऊन्ड सर्टिफिकेट (व्यवसायिक अभ्यासक्रमासाठी)/ बोनाफाईड/प्रवेश पावती/आधारकार्ड/राष्ट्रीयकृत बँकेतील आधार संलग्न खात्याचे पासबुक झेरॉक्स व इतर आवश्यक कागदपत्रे विद्यार्थ्यांनी सोबत बाळगावेत.
योजनेच्या लाभासाठी अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्याकडे जात पडताळणी प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. (व्यवसायिक अभ्यासक्रमासाठी), विद्यार्थ्याचे पालकाचे वार्षिक उत्पन्न मर्यादा अडीच लाखांच्या आत असणे आवश्यक आहे. विद्यार्थ्याचे राष्ट्रीयकृत बँकेत खाते उघडणे बंधनकारक आहे. सदरचे खाते हे आधार क्रमांकाशी सलंग्न असावे. विद्यार्थ्यांने प्रवेश घेतलेली शैक्षणिक संस्था ज्या शहराच्या ठिकाणी आहे. अशा शहरातील सदर विद्यार्थ्याचे पालक रहिवासी नसावे. विद्यार्थ्याचे कमाल वय 28 वर्षापेक्षा अधिक नसावे. आदिम जमातीच्या व पारधी व अनुसूचित जमातीच्या अपंग विद्यार्थ्यांना सदर योजनेच लाभ प्राधान्याने देय राहील. अशी माहिती श्री.पवार यांनी दिली आहे.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377