मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे राजमाता जिजाऊ माँ साहेब यांना जयंती निमित्त अभिवादन
मुंबई, दि. १२ :- राजमाता जिजाऊ माँ साहेब यांना जयंती निमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विनम्र अभिवादन केले आहे.
अभिवादनात मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे की, राजमाता जिजाऊ माँ साहेब छत्रपती शिवाजी महाराज यांचे आराध्य आणि प्रेरणा होत्या. माँ जिजाऊंनी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली. आपल्या मुत्सद्दी, धोरणी आणि लढवय्या कर्तृत्वातून त्यांनी लोककल्याणकारी राज्यकारभाराचा आदर्श घालून दिला. तो आजच्या आधुनिक काळातही मार्गदर्शक आहे. त्यांच्या या कर्तृत्वाला अनुसरून राज्याच्या विकासाला गती देणे, हेच त्यांना अभिवादन ठरेल. त्यासाठी आपण वचनबद्ध होऊया. राजमाता जिजाऊ माँ साहेब यांना जयंती निमित्त कोटी कोटी प्रणाम आणि अभिवादन.
राजमाता जिजाऊ माँ साहेब जयंती निमित्त शासनाच्या विविध विभागांच्या वतीने आयोजित उपक्रम,अभियान यांकरिता मुख्यमंत्र्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
.
.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
Z4 NEWS
मुख्य संपादक- उमेश राऊत
मो : 8411009377