पाचोरा: दि,११ पाचोरा उपविभागीय अधिकारी यांच्यासाठी हक्काचा निवारा असावा या भावनेतून व आ.किशोर अप्पा पाटील यांच्या पाठपुराव्या मूळे तथा तत्कालीन प्रांताधिकारी राजेंद्र कचरे यांच्या कार्यकाळात सूरु झालेल्या प्रांताधिकारी निवासाच्या प्रवासाची फलनिष्पत्ती झाली असून सुमारे ५९ लक्ष रुपये खर्चाचे भडगाव रोड वरील शासकीय विश्राम गृहाच्या परिसरात होणाऱ्या शासकीय निवास्थानाचे भूमिपूजन बुधवारी सकाळी ११ वाजता आमदार किशोर अप्पा पाटील यांचे हस्ते संपन्न झाले.यावेळी प्रांताधिकारी डॉ विक्रम बांदल ,माजी नगराध्यक्ष संजय गोहिल, बांधकाम विभागाचे अभियंता उपअभियंता शेलार ,ज्युनियर अभियंता काजवे यांची उपस्थिती होती.यावेळी खुशाल जोशी यांनी विधिवत पूजा करत कार्यक्रम संपन्न केला.
शासकीय अधिकारी कर्तव्यावर असतांना त्यांना घरी आल्यावर हक्काचे निवासस्थान असावे अशी अनेक वर्षांपासून मागणी होत होती.त्याची दखल घेत आ.किशोर अप्पा पाटील यांनी जिल्हाधिकारी यांचेकडे या मागणीचा पाठपुरावा केला होता.
भूमिपूजन कार्यक्रम प्रसंगी माजी उपनगराध्यक्ष गंगाराम पाटील, माजी उपनगराध्यक्ष शरद पाटे,शिवसेना शहर प्रमुख किशोर बारावकर, नंदू पाटील, प्रवीण पाटील स्वीय सहाय्यक राजेश पाटील, शरद तावडे, अमोल पाटील, राजू पाटील, प्रवीण ब्राह्मणे,सुमीत सावंत, आबा कुमावत, जितू पेंढारकर, एकनाथ पाटील यांची उपस्थिती होती.
पाचोऱ्यात तहसीलदार, पोलिस निरीक्षक, उपनिरीक्षक, अभियंते, पोलीस बांधव यांच्यासाठी देखील हक्काचा निवारा असावा तसेच प्रत्यक गावात तलाठी कार्यालय असावे यासाठी आपला पाठपुरावा सुरू असून लवकरच सर्व अधिकाऱ्यांच्या व पोलीस बांधवांच्या निवासस्थानाचा प्रश्न देखील मार्गी लागणार आहे. किशोरअप्पा पाटील ,आमदर पाचोरा- भडगाव
.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
Z4 NEWS
मुख्य संपादक- उमेश राऊत
मो : 8411009377