पी जे गाडी सुरू करण्यासाठी पाचोरा येथे स्वाक्षरी मोहिम.
पाचो-यात भडरोड येथे ताजे मासे मिळन्याचे ठिकाण? बघा बातमीच्या शेवटी
पाचोरा जामनेर पि जे बचाव कृती समिती मार्फत पी जे गाडी सुरू करण्यासाठी पाचोरा येथे स्वाक्षरी मोहिमेला जनतेचा उत्सफुर्त पाठिंबा भेटला .पाचोरा पी जे बचाव कृती समितीतर्फे पी जे सुरू करण्याच्या मागणीसाठी रेल्वे प्रशासनाला एक लाख सह्यांचे निवेदन देण्यासाठी आज पाचोरा येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकात स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली याला पाचोरा शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून पाठिंबा दिला.सामान्य लोकांची प्रवासवाहिनी असल्याने ती बंद करू नये,तसेच विविध उद्योग -व्यावसायिक ,नोकरदार ,विद्यार्थी अनेक जन या गडीने पाचोरा-जामनेर असा प्रवास करीत परंतु कोरोना काळापासून बंद केलेली रेल्वे सेवा कायमची बंद करण्याचे मानस केंद्रीय रेल्वेचा असल्याने या परिसरातील नागरिक व जेष्ठ – श्रेष्ठ सामाजिक कार्यकर्ते व सर्व पक्षीय नेते मंडळी ही सेवा पूर्ववत करन्यासाठी प्रयत्नशील आहे. तसेच प्रत्यक्ष दिल्ली येथे जाउनही या बाबत पाठपुरावा करणार असल्याचे येथील कृति समितीच्या सदस्यांनी कळविले. यावेळी कृती समितीचे खली दादा देशमुख अविनाश भालेराव पप्पू राजपूत अण्णा भोईटे भरत खंडेलवाल संजय जळे प्रा गणेश पाटील बशीर बागवान प्रताप पाटील सुनील शिंदे रणजीत पाटील अनिल आबा येवले जिप गटनेते रावसाहेब पाटील बँकेचे संचालक अविनाश कुडे मुख्याध्यापक संघाचे गोकुळ पाटील व्यापारी संघटनेचे अध्यक्ष जगदीश पटवारी वकील संघाचे अभय पाटील पंचायत समितीचे माजी सभापती नितीन तावडे जमील सौदागर एकता आटो रिक्षा संघटनेचे एकनाथ सदांशिव बाबा पवार देवीदास पाटील माजी जिल्हाध्यक्ष संभाजी ब्रिगेड गणेश पाटील,प्रवीण साहेबराव पाटील, गुरु लाल पवार ,गौरव चौधरी,मोहित पाटील,प्रशांत गौड़,अनिकेत(नानू) सूर्यवंशी , यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
.
पाचोरा जामनेर पी जे बचाव कृती समितीमार्फत लोक चळवळीतील नेते स्वर्गवासी प्राध्यापक एन डी पाटील यांना सकाळी अकरा वाजता कृती समितीच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली वाहून सह्यांच्या मोहिमेला सुरुवात करण्यात आली
.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
Z4 NEWS
मुख्य संपादक- उमेश राऊत
मो : 8411009377