पाचोऱ्यात दोन महिन्याचे रेशनिंग धान्यासाठी कॉंग्रेस चे आंदोलन तहसीलदांनी घेतली तात्काळ दखल
पाचोरा – रेशनिंग धान्य गेल्या दोन महिन्यांपासून मिळाले नसुन शहर आणि ग्रामीण भागात तात्काळ धान्य वाटपासाठी कॉंग्रेस चा आंदोलनाचा इशारा चे निवेदनाची दखल घेत तात्काळ धान्य पुरवठा करण्याचे आदेश तहसीलदारांनी दिले.
महसुल विभाग अंतर्गत पुरवठा विभागाने गेल्या दोन महिन्यांपासून शहर आणि ग्रामीण भागातील नागरिकांना मोफत आणि विकत चे धान्य जानेवारी सह फेब्रुवारी महिन्याचे वाटप अद्याप झालेले नाही त्यात ग्रामीण भागात काही दूकानदार नागरिकांनासाठी धान्य वाटप केल्याचे सांगितले आहे मात्र अद्याप बहुतांश लोकांनी वाटप केले नाही ते तात्काळ वाटप करण्यात यावे यासाठी कॉंग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार कैलास चावडे यांना आंदोलन चा इशारा एका निवेदनाद्वारे देण्यात आला आहे यावेळी कॉंग्रेस चे शहर अध्यक्ष अॅड अमजद पठाण, माजी अध्यक्ष साहेबराव पाटील, शेख इस्माईल शेख फकिरा, महीला शहर अध्यक्षा अॅड मनिषा पवार, ओबीसी सेल अध्यक्ष शेख इरफान मनियार, राहुल शिंदे, अमजद खान मजीद खान, शरीफ शेख, शंकर सोनवणे, तन्वीर शाह, मोहम्मद खान रशिद खान, सैय्यद युसूफ सैय्यद इमाम, प्रदीप चौधरी, गंगाराम तेली, अमजद खान नासिर खान, सलीम शेख, सैय्यद लाल आदी उपस्थित होते. तहसील कार्यालयातील पुरवठा विभागाने झोपेचे सोंग नघेता जे दुकानदार धान्य घेण्यासाठी हेतुपुरस्सर चलन भरत नाही अशांना नोटीस नदेता पाठीशी घालण्याचे काम होत आहे. नागरिकांना प्रति माणूस तीन किलो गहु दोन कीलो तांदुळ आणि ग्रामीण भागातील साखर देणे बंधनकारक आहे जे दुकानदार देत नसतील त्यांनी कॉंग्रेस पदाधिकारी यांच्याशी संपर्क करा असे आवाहन करण्यात आले आहे. यावेळी तहसीलदार कैलास चावडे यांनी कॉंग्रेस पदाधिकारींना दोन महिने पासून धान्य पुरवठा होत नाही हे सत्य असुन तांत्रिक कारणांमुळे झाले असून आजच संबंधित विभागाच्या बैठका घेऊन पुरवठा तात्काळ करण्यात येईल असे आश्वासन दिले
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
Z4 NEWS
मुख्य संपादक- उमेश राऊत
मो : 8411009377