श्री.सु.भा.पाटील प्राथमिक विद्यामंदिर मुख्य इमारत व भडगाव रोड विभाग पाचोरा येथे आज सन-2021/22 इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांना निरोप देण्यासाठी निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.मुख्य इमारत येथे समारंभाचे अध्यक्ष श्री.गो. से.हायस्कूलचे मुख्याध्यापक मा.श्री. सुधीर पाटील सर तर भ.रो.विभाग समारंभाच्या अध्यक्षस्थानी श्री.गो.से. हायस्कूलच्या उपमुख्याध्यापिका मा. सौ.प्रमिला वाघ मॅडम होत्या. तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री.गो.से. हायस्कूलचे पर्यवेक्षक,श्री.नरेंद्र ठाकरे सर,जेष्ठ शिक्षिका श्रीमती. संगीता वाघ मॅडम,ज्येष्ठ शिक्षक श्री.पी.एम.पाटील सर,श्री.आर.बी.बोरसे सर,श्री.अरुण कुमावत सर,शाळेचे मुख्याध्यापक श्री.अशोक परदेशी सर व पालक वर्ग उपस्थित होता.
समारंभाची सुरुवात स्वागत गीत व माँ सरस्वतीच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली.त्यानंतर मान्यवरांच्या व इयत्ता चौथीच्या निरोपार्थी विद्यार्थ्यांचा प्रातिनिधिक स्वरूपात स्वागत सोहळा झाला.तदनंतर विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेविषयी व गुरुजनाविषयी हृदयस्पर्शी शब्दात मनोगते व्यक्त केली.त्याचप्रमाणे विविध स्पर्धातील गुणवंत विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीसे प्रदान करण्यात आली. शाळेतील ज्येष्ठ शिक्षिका सौ. सारिका पाटील मॅडम,श्री.मनोज पवार सर,पालक प्रतिनिधी श्री.विठ्ठल महाजन,सौ.अनिता दायमा,श्री.गो.से. हायस्कूलचे पर्यवेक्षक श्री.नरेंद्र ठाकरे, श्री.अरुण कुमावत सर यांनी आपली मनोगते व्यक्त करून विद्यार्थ्यांना उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्यात.मा.श्री.सुधीर पाटील सर व सौ.प्रमिला वाघ मॅडम यांनी देखील आपल्या अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांना अनमोल असे मार्गदर्शन केले.निरोपार्थी विद्यार्थ्यांना शाळेतर्फे अल्पोपाहार देण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक श्री.अशोक परदेशी सर यांनी तर सूत्रसंचालन श्री.दीपक पाटील सर,श्रीमती वर्षा पाटील मॅडम यांनी तर आभार प्रदर्शन श्री.संदीप वाघ सर व श्री.राकेश पाटील सर यांनी केले.कार्यक्रमाचे छायाचित्रण श्री. रवींद्र महाले व श्री.संदीप वाघ सर यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
Z4 NEWS
मुख्य संपादक- उमेश राऊत
मो : 8411009377