माणुसकी वृद्ध सेवालयाचा भव्य उदघाटन सोहळा व भूमिपूजन मोठ्या थाटात झाले संपन्न..

बेवारस निराधारांच्या मदतीसाठी हक्काचे घर आजपासून खुले
सु-लक्ष्मी बहुद्देशिय सेवाभावी संस्थेच्या सहकार्याने,मानव सेवा हीच ईश्वर सेवा,हे ब्रीद वाक्य प्रमाणे सु-लक्ष्मी बहुद्देशिय सेवाभावी संस्था संचलित माणुसकी वृद्ध सेवालयाचे भव्य उदघाटन सोहळा व भूमिपूजन मा सचीन सानप, पोलीस निरीक्षक. मा अमोल देवकर,पोलीस निरिक्षक हर्सुल यांच्या हस्ते पार पडला.

सोहळ्याचे आयोजन दि.१६/०४/२०२२ ,शनिवार रोजी सकाळी ११.३० वाजता आयोजित करण्यात आले होते.तसेच चार्ली चॅप्लिन यांची १३४ वी जयंती निमित्ताने भारतभरात १३४ विद्यार्थी चार्ली चॅप्लिन भूमिका प्रशिक्षण देण्याचा संकल्प सोमनाथ स्वभावणे यांच्या संकल्पनेतुन यावेळी प्रारंभ करण्यात आला.चार्ली यांची जयंती साजरी करतांना समाजसेवक गजानन क्षिरसागर यांनी त्याच्यां कार्यावर उजाळा टाकला.उद्घाटनप्रसंगी बोलतांना पोलीस निरिक्षक सचीन सानप यांनी माणुसकी समुहाच्या कार्याचे कौतुक करीत शुभेच्छा दिल्या, तसेच पोलीस निरिक्षक अमोल देवकर यांनी वृध्दाच्या वृधपकाळात मुलांनी आई वडिलांना असे रस्त्यावर न सोडता त्यांची वृध्दपकाळात काठि व्हावी व त्यांना असे वाऱ्यावर न सोडता ते आपले जन्म दाते आहे, त्यांचा सांभाळ करावा जेनेकरुन वृध्दाश्रमात पाठवायची वेळ येणार नाही.समाजसेवक सुमित पंडित यांनी वृध्द सेवालयाची माहिती देतांना सांगितले कि, रस्त्याच्या कडेला उघड्यावर पडलेल्या पिकलेल्या निराश्रित आयुष्याची संध्याकाळ सुखद व्हावी या सद्हेतूने व माणुसकीच्या बांधिलकीच्या जाणिवेतून माणुसकी वृद्धसेवालय आजपासुन गरजुन साठी खुले केले आहे.या कार्यक्रमासाठी सचीन सानप,अमोल देवकर,पोलीस निरीक्षक हर्सुल,मुक्ताराम पा.गव्हाणे,सागर पागोरे,शिवाजी भोसले पोलीस,पुनमचंद चव्हाण सरपंच,जगन चव्हाण, कैलास भोसले,गजानन क्षिरसागर,
कुलभूषण अन्नदाते,ज्युनिअर चार्ली सोमनाथ स्वभावणे,शीवा चव्हाण,वीशाल नांदरकर,समाजसेवक सुमित पंडित,समाजसेविका सौ पुजा पंडित,प्रवीणा अन्नदाते व ग्रामस्थ उपस्थीत होते.हा कार्यक्रम माणुसकी वृध्द सेवालय कैलास पा. भोसले यांच्या मळ्यात साई मंदिराजवळ धोपटेश्वर जटवाडा रोड औरंगाबाद येथे सपंन्न झाला,या वृध्द सेवालयाकरीता औरंगाबाद करांनी भरपुर सेवाकार्य केले आहे. सर्वाच्या मदतीने हे माणुसकी सेवालय वृध्दाच्या अन्न,वस्त्र निवारा याकरीता खुले करण्यात आले आहे.असे माणुसकी सेवालयाच्या संचालिका सौ पुजा सुमित पंडित यांनी सांगितले.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
Z4 NEWS
मुख्य संपादक- उमेश राऊत
मो : 8411009377



