पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याहस्ते 1मे रोजी वर्धापन दिनी ध्वजारोहण
जळगाव, – महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 62 व्या वर्धापन दिनाचा मुख्य शासकीय कार्यक्रमानिमित्त रविवार दिनांक 1 मे, 2022रोजी सकाळी 8 वाजता पोलीस कवायत मैदान, पोलीस मुख्यालय, जळगाव येथे पालकमंत्री गुलाबराव पाटील जळगाव जिल्हा यांचे हस्ते ध्वजारोहण होणार आहे. या कार्यक्रमास सर्व लोक प्रतिनिधी, स्वातंत्र सैनिक, शहीद जवानांच्या पत्नी व आई – वडील आणि कोरोनायोध्दा नागरिक आदींनी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले आहे. महाराष्ट्र दिनाच्या मुख्य शासकीय समारंभात सहभागी होता यावे, यासाठी 1 मे, 2022 रोजी सकाळी 7.15 ते 9 च्या दरम्यान ध्वजारोहणाचा किंवा इतर कोणताही शासकीय किंवा अर्धशासकीय समारंभ आयोजित करण्यात येऊ नये, जर एखादया कार्यालयास अथवा संस्थेला आपला स्वत:चा ध्वजारोहण समारंभ आयोजित करावासा वाटल्यास त्यांनी तो सकाळी 7.15 च्या पूर्वी किंवा सकाळी 9 च्या नंतर आयोजित करावा, असे निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांनी कळविले आहे.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
Z4 NEWS
मुख्य संपादक- उमेश राऊत
मो : 8411009377