गुरुकुल स्कूल, पाचोरा येथील विद्यार्थी ओम फनेंद्र लोहार याची राज्यस्तरीय मिनी व्हॉलीबॉल अजिंक्य पद स्पर्धेसाठी निवड
दि.24/04/2022 रोजी नासिक विभागस्तरीय व्हॉलिबॉल निवड चाचणी घेण्यात आली
महाराष्ट्र व्हॉलीबॉल असोसिएशनच्या वतीने मिनी राज्य व्हॉलीबॉल अजिंक्य पद स्पर्धा मुले/मुली (14 वर्षाखालील) 2021-22 नागपूर येथे दिनांक 07/05/2022 ते 09/05/2022 दरम्यान समर्थ व्यायाम शाळा प्रतापनगर नागपूर येथे आयोजित करण्यात आल्या आहेत. सदर स्पर्धेत नाशिक विभागीय संघ सहभागी होणार आहे. या संघात गुरुकुल इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज पाचोरा मधील इयत्ता सातवी चा विद्यार्थी ओम फनेन्द्र लोहार याची निवड झाली आहे. प्रशिक्षक आकाश महालपुरे सर योग्य मार्गदर्शन करत आहेत.
तसेच, या प्रसंगी जिल्हा पातळी पासून ते विभागीय पातळीपर्यंत प्रावीण्य मिळविले बद्दल व राज्य पातळीवर निवड झाल्या बद्दल शाळेचे प्राचार्य श्री प्रेम शामनाणी, मुख्याधपिका सौ.कल्पना वाणी, सौ. अमिना बोहरा व शिक्षक वृंद यांनी ओम चे पालकांसोबत सत्कार केले व पुढील वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
Z4 NEWS
मुख्य संपादक- उमेश राऊत
मो : 8411009377