खरीप पिकविमा २०२१ अंतर्गत नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात-
भाजपाच्या अमोल शिंदे यांच्या सततच्या पाठपुराव्याला यश
पाचोरा दि 5 – पिकविमा योजना खरीप हंगाम २०२१ अंतर्गत पात्र विमाधारक शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची उर्वरित रक्कम बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली असून याआधी देखील खरीप हंगाम २०२१ अंतर्गत उत्पन्नावर आधारित नुकसान (YILD BASED LOSSES) भरपाई साठी मदत मिळावी म्हणून त्यासाठी पिकांचे खरीप हंगामात सुरवातीला पडलेल्या पावसामुळे खंड तसेच नंतर झालेली अतिशवृष्टी व पूर परिस्थितीमुळे नुकसानीचे पंचनामे तात्काळ करावे व पीक विमा योजनेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ मदत व्हावी.याकरिता भाजपा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांनी त्यावेळी मागणी केली होती. व त्या अनुषंगाने संबंधित विमा कंपनी (ICICI Lombard General Insurance Company Ltd.) ने तात्काळ नुकसान भरपाई द्यावी अशी देखील मागणी यावेळी निवेदनाद्वारे केली होती.
सदरच्या मागणी व सततच्या पाठपुराव्याने नुकसानीचे पंचनामे झालेल्या शेतकऱ्यांना व प्रतिकूल हवामान परिस्थिती (Mid Season Adversity) मध्ये पाचोरा व भडगाव तालुक्यातील पात्र एकूण ७७१ शेतकऱ्यांना रक्कम रुपये ८५ लाख २८ हजार २९८ तसेच वैयक्तिक नुकसान व सॅम्पल सर्वेनुसार झालेल्या नुकसानी करिता पाचोरा व भडगाव तालुक्यातील ४४६० शेतकऱ्यांना रक्कम रुपये ०१ कोटी ७८ लाख ५० हजार ४२८ रुपये आज पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेली आहेत.
परंतु उर्वरित शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम म्हणजेच सॅम्पल उत्पन्नावर निश्चित झालेले नुकसान भरपाई (Yield Based Losses) ची रक्कम सदरील विमा कंपनी कडून शेतकऱ्यांना मिळालेली नव्हती.तसेच सदर नुकसानीची रक्कम निश्चित करताना आवश्यक असलेले पीक कापणी प्रयोगाचे संकलन (Crop Cutting Experiment) देखील जिल्ह्यात पूर्ण झाले होते. तरी ही रक्कम तात्काळ मिळावी याकरिता भाजपाच्या अमोल शिंदे यांनी दि.२१ मार्च २०२२ रोजी जिल्हा कृषी अधीक्षक व मा.जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन खासदार उन्मेषदादा पाटील यांच्या माध्यमातून सततचा पाठपुरावा व अधिकाऱ्यांसह विमा कंपनीशी वेळोवेळी संपर्क साधून मदत तात्काळ कशा पद्धतीने शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल यासाठी प्रयत्न केले. व त्या प्रयत्नांना यश म्हणून शेतकऱ्यांच्या खात्यावर उर्वरित नुकसान भरपाईची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली असून उडीद,मूग,सोयाबीन व त्यानंतर कापूस,मका,बाजरी या अनुक्रमे पिकांची नुकसान भरपाईची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे. येणाऱ्या दहा दिवसांच्या आत सर्व लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम जमा होईल व त्यात काही तांत्रिक अडचणी उद्भवल्यास शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा असे अमोल शिंदे यांनी बोलताना सांगितले सदर प्रलंबित नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत असल्याने शेतकऱ्यांना मध्ये मोठ्या प्रमाणात आनंदाचे वातावरण असून शेतकऱ्यांनी खासदार उन्मेष पाटील व अमोल शिंदे यांचे आभार व्यक्त केले.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
Z4 NEWS
मुख्य संपादक- उमेश राऊत
मो : 8411009377