पाचोरा नगरपरिषद पाचोरा सार्वत्रिक निवडणूक 2022 आरक्षण सोडत कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाचे आदेशानूसार दिनांक 13/06/2022 रोजी दुपारी 3-00 वाजता नगरपरिषद सभागृह येथे आयोजीत करण्यात आलेला होता. त्यानूसार एकूण 14 प्रभागांमधून 28 सदस्य संख्या यापुर्वीच निश्चीती झालेली होती. त्यानूसार खालील तक्त्याप्रमाणे आरक्षण सोडत काढण्यात आली.
प्रभाग क्रं.(1) अ अनुसुचीत जाती (महिला), प्रभाग क्रं.(1) ब- सर्वसाधारण
प्रभाग क्रं.(2) अ अनुसुचीत जाती (महिला), प्रभाग क्रं.(2) ब- सर्वसाधारण
प्रभाग क्रं.(3) अ सर्वसाधारण (महिला), प्रभाग क्रं.(3) ब- सर्वसाधारण
प्रभाग क्रं.(4) अ सर्वसाधारण (महिला), प्रभाग क्रं.(4) ब- सर्वसाधारण
प्रभाग क्रं.(5) अ सर्वसाधारण (महिला), प्रभाग क्रं.(5) ब- सर्वसाधारण
प्रभाग क्रं.(6) अ अनूसुचीत जमाती प्रभाग क्रं.(6) ब- सर्वसाधारण (महिला)
प्रभाग क्रं.(7) अ अनूसुचीत जाती प्रभाग क्रं.(7) ब- सर्वसाधारण (महिला)
प्रभाग क्रं.(8) अ सर्वसाधारण (महिला), प्रभाग क्रं.(8) ब- सर्वसाधारण
प्रभाग क्रं.(9) अ सर्वसाधारण (महिला), प्रभाग क्रं.(9) ब- सर्वसाधारण
प्रभाग क्रं.(10) अ सर्वसाधारण (महिला), प्रभाग क्रं.(10) ब- सर्वसाधारण
प्रभाग क्रं.(11) अ सर्वसाधारण (महिला), प्रभाग क्रं.(11) ब- सर्वसाधारण
प्रभाग क्रं.(12) अ सर्वसाधारण (महिला), प्रभाग क्रं.(12) ब- सर्वसाधारण
प्रभाग क्रं.(13) अ सर्वसाधारण (महिला), प्रभाग क्रं.(13) ब- सर्वसाधारण
प्रभाग क्रं.(14) अ सर्वसाधारण (महिला), प्रभाग क्रं.(14) ब- सर्वसाधारण
सदर आरक्षण सोडतीवर हरकती व सुचना दिनांक 15/06/2022 ते 21/06/2022 पावेतो मागविण्याचा कालावधी आहे.
सदर बैठकीस पिठासीन अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी डॉ.विक्रम बांदल यांच्या अध्यक्षतेखाली सदर आरक्षण सोडतीचा कार्यक्रम पडला. सदर आरक्षण सोडतीकरीता गो.से.हायस्कूल कडून आलेले शिक्षक रविंद्र जाधव यांच्या समवेत असलेले विद्यार्थी चि. देवांश प्रमोद महाजन (इ5 वी) व कु.गित जितेंद्र महाजन (इ.6 वी) या विद्यार्थ्यांच्या हस्ते सर्वांसमोर चिठ्ठी काढण्यात आली. सदर प्रक्रियेचे व्हिडीओ चित्रीकरण करण्यात आले व सदर प्रक्रिया अतिशय पारदर्शकपणे व राज्य निवडणूक आयोगाचे निर्देशांन्वये पुर्ण करण्यात आली. यावेळी पाचोरा नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी तथा प्रशासक श्रीमती.शोभा बाविस्कर, उपमुख्याधिकारी श्री.दगडू शिवाजी मराठे, प्रशासकिय अधिकारी श्री.प्रकाश भोसले, तसेच अधिकारी कर्मचारी व शहरातील नागरीक मोठया संख्येने उपस्थित होते.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
Z4 NEWS
मुख्य संपादक- उमेश राऊत
मो : 8411009377