पाचोरा तालुका बलात्कारिंचे हब बनतोय ?
पाचोरा– तालुक्यातील एका महिलेला दुचाकीवर जबरीने बसवून आरोपीने शेतात नेऊन अमानुष अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एवढेच नाही तर नराधमाने अत्याचार केल्याचा व्हिडीओ देखील बनविला असल्याची तक्रार पिडीत महिलेने दिली आहे.याप्रकरणी पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पाचोरा तालुक्यातील
एका गावातील ४० वर्षीय महिला, तिचा भाऊ व मुलासह
वास्तव्याला आहे.दि५ जून २०२२ रविवार रोजी रात्री ९
वाजेच्या सुमारास महिला घरी एकटी असतांना संशयित
आरोपी आबा अंबादास कोळी राहाणार घोसला ,तालुका
सोयगाव ,जिल्हा औरंगाबाद हा दुचाकीवर येवून तुला तुझ्या
बहिणीच्या घरी सोडतो असे सांगितले. याला नकार दिल्याने
शिवीगाळ करून तुझ्या भावासह मुलाला मारून टाकण्याची धमकी देत तिला दुचाकीवर जबरी बसवून घेवून गेला. संशयित आरोपीने त्या महिलेस त्याच्या शेतातील झाडाखाली नेऊन तोंडात कापडाचा बोळा कोंबून अत्याचार केला.
एवढेच नाही तर अत्याचाराचा व्हिडीओ देखील बनविला.
त्यानंतर मारहाण करून खिश्यातील भिलावा दगडाने
फोडून त्याचे तेल शरीरावर नको त्या ठिकाणी लावून छळ केला.या प्रकरणी पिडीत महिलेच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी आबा आंबादास कोळी याच्या विरोधात पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्यात रितसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सदर पोलिस स्टेशन मधून अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता यावर तपास सुरू असल्याने भाष्य करणे टाळले तर पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र वाघमारे करीत आहे.
अशा बलात्काराच्या घटना पाचोरा तालुक्यात वारंवार होत असताना कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे मागील महिन्यात एका मागासवर्गीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार केल्याची घटना ताजी असताना पुन्हा ही घटना घडली पाचोरा शहरात मागील आठवड्यात अतिप्रसंगाची घटना टळून विनयभंगाची घटना घडली या अशा घटना वारंवार होत असताना महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आलेला आहे
तालुक्यातील सर्वपक्षिय लोकप्रतिनिधीनी आता याकडे लक्ष देणे गरजेचे आहे .कायद्याचा धाक आता अपप्रवृत्तीच्या लोकांना उरलेला नाही अशी भावना जनसामान्यात रुजू होत आहे त्यामुळे कायद्याची कठोर अंमलबजावणी होणे गरजेचे आहे .
पाचोरा तालुका जळगाव जिल्ह्यातील एक विकसनशील तालुका आहे येथील विकासकामे बघता आज जिल्ह्यात कुठेही एवढा विकास सुरू नाही. असे समजते, प्रतिष्ठीत तालुका म्हणुन ओळख आहे . येथील ईतर गुन्ह्यांचे प्रमाण कमी आहे अधिक असले तरी बलात्काराचे प्रकरणें अधिक वाढत आहे त्यामुळे तालुक्याचे नाव सदर गुन्ह्यांचे यादीत उच्च स्थानावर समाविष्ट होण्यास वेळ लागणार नाही वेळीच उपाय योजना करण्यात आल्या तर बरं नाहीतर गुन्हेगारांची हिम्मत वाढून दिवसा ढवळ्या अशा घटना घडल्या शिवाय राहणार नाही.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
Z4 NEWS
मुख्य संपादक- उमेश राऊत
मो : 8411009377