पाचोऱ्यात भाजपचा आनंदोत्सव साजरा महाराष्ट्राला प्रगतीच्या दिशेने नेणार सरकार स्थापन- अमोल शिंदे
पाचोरा- मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड झाल्यानंतर आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने पाचोरा येथे आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी अटल भाजपा कार्यालय येथुन ढोल-ताशांच्या गजरात जात छ. शिवाजी महाराज व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले. फटाक्यांच्या आतिषबाजीत कार्यकर्त्यांनी घोषणा देत आनंदोत्सव साजरा केला.
यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांनी मागील आघाडी सरकारवर घणाघात करत आघाडी सरकारने मागील अडीच वर्षात राज्य अधोगतीला नेले असा आरोप करत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र प्रगतीच्या दिशेने वाटचाल करेल असे सांगितले याप्रसंगी – तालुकाध्यक्ष अमोल शिंदे, जिल्हा सरचिटणीस मधुकर काटे, व्यापारी आघाडीचे जिल्हाध्यक्ष कांतीलाल जैन, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष रेखाताई पाटील,विधानसभा क्षेत्र प्रमुख हिम्मतसिंग निकुंभ, शहराध्यक्ष रमेश वाणी,तालुका सरचिटणीस गोविंद शेलार,दीपक माने,भाजयुमो शहराध्यक्ष समाधान मुळे,मा.पं. समिती सदस्य बन्सीलाल पाटील,वसंत गायकवाड,ज्ञानेश्वर सोनार,वैद्यकीय आघाडी प्रमुख शांतीलाल तेली,विनोद पाटील, राहुल गायकवाड,परेश पाटील, विरेंद्र चौधरी,जगदीश पाटील,बाळू धुमाळ,भैया ठाकूर आदी पदाधिकारी उपस्थित होते.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
Z4 NEWS
मुख्य संपादक- उमेश राऊत
मो : 8411009377