सिल्लोडचे आमदार यांनी मुंबईतील रवींद्र नाट्य मंदिर येथे आयोजित केलेल्या भव्य मेळावा आणि नागरी सत्कार सोहळ्यास उदंड प्रतिसाद.
सिल्लोड विधानसभा मतदार संघाचे आमदार अब्दुल सत्तार यांनी मुंबईतील रवींद्र नाट्य मंदिर येथे आयोजित केलेल्या भव्य मेळावा आणि नागरी सत्कार सोहळ्यास सिल्लोडकर नागरिकांनी दिला उदंड प्रतिसाद दिला.
याप्रसंगी आमदार संदीपान भुमरे, आमदार प्रकाश अबिटकर, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार ज्ञानराज चौगुले आणि सिल्लोड सायगाव मतदारसंघातील अनेक नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढील अडीच वर्षात यातील प्रत्येकाच्या मतदारसंघात विकासकामे करून त्यांना पुन्हा निवडून आणणारच असे निक्षून मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.औरंगाबाद चे संभाजीनगर नामकरण करण्याचा निर्णय बहुमत नसलेल्या मविआ सरकारने बेकायदेशीरपणे घेतलेला असून नवीन सरकार सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता करून तो पुन्हा एकदा घेणार असल्याचेही स्पष्ट केले
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
Z4 NEWS
मुख्य संपादक- उमेश राऊत
मो : 8411009377