गिरना नदी काठावरील नागरिकांना सुरक्षिततेचा इशारा
जळगाव,दि१५ – गिरना धरणातील जलसाठा पर्यंत ८० टक्के जिवंत साठा झालेला असून वरून येणारा पुराचा येवा बघता व धरण सुरक्षिततेचा आढावा घेऊन आज दुपारनंतर गिरना धरणातून जास्तीचे पुराचे पाणी खाली गिरना नदीत सोडण्यात येणार आहे, तरी नदी काठावरील नागरिकांनी सावध रहावे, कोणतीही जीवित व वित्त हानी होणार नाही याची काळजी घ्यावी, पुराचा प्रवाह हा पाणलोट क्षेत्रातून येणाऱ्या येवा प्रमाणे कमी जास्त करण्यात येईल.साधारणतः धरणातून करण्यात येणारा विसर्ग हा सुरवातीला २०००० क्यूसेक इतका राहील व तदनंतर पाणलोट क्षेत्रातून येणाऱ्या येवानुसार विसर्ग १००००० क्यूसेक पर्यंत जाण्याची शक्यता आहे, तो येणाऱ्या येवानुसार वेळो वेळी कमी जास्त होऊ शकतो ,तरी सर्वांनी खबरदारी घ्यावी ही असे आवाहन जिल्हा प्रशासन ,जळगाव व कार्यकारी अभियंता, गिरना पाटबंधारे विभाग, जळगाव व यांच्या वतीने करण्यात आलेआहे.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
Z4 NEWS
मुख्य संपादक- उमेश राऊत
मो : 8411009377