पाचोरा रोटरी क्लब तर्फे श्री स्वामी समर्थ केंद्राला बिछायत भेट
पाचोरा,दि21 – येथील ‘रोटरी क्लब ऑफ पाचोरा- भडगाव: व ‘दिशा डेंटल केअर सेंटर,पाचोरा,’ यांच्या संयुक्त विद्यमाने श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक व बालसंस्कार केंद्र संघवी कॉलनी पाचोरा येथे भाविकांसाठी बिछायत भेट देण्यात आली. केंद्रात विविध दैनंदिन व विशेष धार्मिक कार्यक्रमाकरिता सेवेकरी बंधू-भगिनींना बसण्याची सोय व्हावी या उद्देशाने हा उपक्रम घेण्यात आला. रोटरी क्लबचे नूतन अध्यक्ष डॉ. अमोल जाधव, सेक्रेटरी डॉक्टर गोरखनाथ महाजन, केंद्राचे प्रमुख गोकुळ पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला
या कार्यक्रम प्रसंगी आलेल्या सर्व रोटेरियन बांधवांचे श्रीफळ व गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष अतुल शिरसमणे, यांनी रोटरीचे विविध उपक्रम व सेवाभावी प्रकल्प याबद्दल माहिती सांगितली. केंद्राचे जेष्ठ सेवेकरी रामभाऊ जवळकर यांनी श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक व बालसंस्कार केंद्राच्या उपक्रमांची माहिती रोटरी क्लबच्या सदस्यांना करून दिली. ज्येष्ठ सेवेकरी संजय पाटील यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले. नरेश गर्गे यांनी आभार मानले.
या कार्यक्रम प्रसंगी रोटरी क्लबचे भरत सिनकर चंद्रकांतजी लोढाया, राजेश बाबूजी मोर, डॉ. विशाल पाटील, डॉ. अजय परदेशी, रोहन पाटील, रावसाहेब बोरसे, शैलेश खंडेलवाल , बी.एस. दादा, पाथडकर साहेब, रमेश वारुळे, पितृभक्त सर, दुष्यंत सर, संजय पाटील, इतर बरेच सेवेकरी बंधू-भगिनी या कार्यक्रमास हजर होते.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
Z4 NEWS
मुख्य संपादक- उमेश राऊत
मो : 8411009377