पाचोरा कन्या विद्यालयाला राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमा भेट
पाचोरा,दि 21 – येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक मिठाबाई कन्या विद्यालयाचे वरिष्ठ लिपिक शिवाजी बागुल यांनी आपल्या वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ कन्या विद्यालयाला राष्ट्रपुरुषांच्या दहा प्रतिमा भेट दिल्या. शिवाजी बागुल यांचे पिताश्री माजी मुख्याध्यापक स्व. सुखदेव कौतिक बागुल यांनी औरंगाबाद जिल्हा परिषद अंतर्गत मराठवाड्यातील विविध शाळांमध्ये आपली सेवा बजावली. वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ वरिष्ठ लिपिक शिवाजी बागुल यांनी स्वतः कार्यरत असलेल्या मीठाबाई शाळेला या प्रतिमा भेट दिल्या. याप्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य संजय पवार, पर्यवेक्षक सुवर्णसिंग राजपूत, शिक्षक आर. के. माळी, जयदीप पाटील, पी.जी. चौधरी, सुभाष जाधव, सौ. उज्वला महाजन, सौ कुंदा पाटील -शिंदे, हिरालाल परदेशी, आबाजी पाटील, शकील खाटीक आदी शिक्षक , शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
Z4 NEWS
मुख्य संपादक- उमेश राऊत
मो : 8411009377