निवृत्तीवेतन धारकांसाठी संकेतस्थळे विकसीत -शरद निकुम

जळगाव, दि. 22 : राज्यातील शासकीय निवृत्तीवेतन धारकांसाठी एक संकेतस्थळ निर्माण करण्यात आले आहे. त्यावर निवृत्तीवेतन प्रस्ताव पाठविण्यापासून तर निवृत्तीवेतन प्राप्त होईपर्यंतच्या सर्व ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत, अशी माहिती जिल्हा कोषागार अधिकारी शरद निकुम यांनी दिली.
जळगाव जिल्हा कोषागार कार्यालयामध्ये एक निवृत्तीवेतनधारकांचा मेळावा नुकताच पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा कोषागार अधिकारी शरद निकुम होते. सुनील गरुड, सु.ह.गुंजाळ, अप्पर कोषागार अधिकारी (निवृत्तीवेतन), शिंपी, तसेच एस.डब्ल्यू पाटील, आर. सी. सोनवणे, माध्यमिक शिक्षक निवृत्तीवेतनधारक संघटनेचे पदाधिकारी आदी कार्यक्रमास उपस्थित होते. सर्वप्रथम संकेतस्थळाची प्रत्यक्ष ओळख पॉवरपॉइंट सादरीकरण व व्हिडिओच्या माध्यमातून गणेश नांदगुडे, आनंद मानकर व गणेश सानप यांनी सर्व ऑनलाईन माहिती याविषयीची प्रत्यक्ष माहिती दिली. https://pension.mahakosh.gov.in/login.jsp https://agmaha.cag.gov.in
या संकेतस्थळावर निवृत्तीवेतनधारक सर्व अपडेट्स पाहू शकतात. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश कोकरे यांनी केले. अजय पाटील यांनी आभार मानले.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
Z4 NEWS
मुख्य संपादक- उमेश राऊत
मो : 8411009377



