शासकीय तांत्रिक महाविद्यालयात कॉम्प्युटर सायन्स (बायफोकल) साठी प्रवेश सुरू

जळगाव, दि.23 : जिल्ह्यातील जामनेर येथील शासकीय तांत्रिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे 11 वी कॉम्प्युटर सायन्स (बायफोकल) अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. संस्थेच्या संलग्न विद्यालयातून विज्ञान शाखेत प्रवेश घेऊन विद्यार्थ्यांना कॉम्प्युटर सायन्स या अभ्यासक्रमाची निवड करता येणार आहे. शासकीय महाविद्यालयात 150 जागांसाठी ही प्रवेश प्रक्रिया राबवली जाणार असल्याची माहीती शासकीय तांत्रिक विद्यालयाचे मुख्याध्यापक एम. एस. राजपूत यांनी दिली.
बायफोकल अभ्यासक्रमांतर्गत 11 वी प्रवेशात एक भाषा आणि एक वैकल्पिक विषया ऐवजी कॉम्प्युटर सायन्स अभ्यासक्रमाचा 200 गुणांचा (100 थेअरी + 100 प्रात्यक्षिक) विषय घेता येईल. प्रात्यक्षिकांवर सर्वाधिक भर असल्याने विद्यार्थ्यांना उत्तम गुण मिळवून पुढील शिक्षणाचा पाया भक्कम होईल. सदर अभ्यासक्रमासाठी शा.तां.वि.जामनेर येथे अद्ययावत यंत्र सामुग्री व सुसज्ज कार्यशाळा आणि प्रशिक्षित शिक्षक वर्ग उपलब्ध आहे.
12 वी नंतर अभियांत्रिकीच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्यांना कॉम्प्युटर सायन्स हा विषय अधिक फायदेशीर ठरतो. याच बरोबर शासन निर्णयानुसार पुढील वर्षापासून व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी 12 वी चे गुण आणि सीइटीला मिळालेले गुण सम प्रमाणात ग्राह्य धरले जाणार आहेत. त्यामुळे येत्याकाळात विद्यार्थ्यांना कॉम्प्युटर सायन्स या अभ्यासक्रमाचा फायदा होईल, असेही त्यांनी कळविले आहे. तसेच संलग्न महाविद्यालय इंदिराबाई ललवाणी माध्य. व उच्च माध्य. विद्यालय, जामनेर जि. जळगाव, असल्याचेही त्यांनी कळविले आहे.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
Z4 NEWS
मुख्य संपादक- उमेश राऊत
मो : 8411009377



