तृणधान्य, कडधान्य, गळीतधान्य पिकांच्या राज्यांतर्गत पीक स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन

जळगाव, दि. 26 – राज्यातील पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी, कृषि उत्पादकतेमध्ये भर घालण्यासाठी शेतकऱ्यांचे योगदान मिळेल. राज्याच्या एकूण उत्पादनात मोलाची भर पडेल हा उद्देश ठेऊन राज्यांतर्गत पीकस्पर्धा योजना राबविण्यात येत आहे. या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने केले आहे.
स्पर्धेत अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख खरीप हंगामासाठी मुग व उडीद पीक 31 जुलै व भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी) तूर, सोयाबीन, भूईमूग, सूर्यफूल अंतिम 31 ऑगस्ट आहे.
पीक स्पर्धेतील पिकांची निवड करताना पीकनिहाय तालुक्यातील संबंधित पिकाखालील क्षेत्र किमान हजार हेक्टर असावे. किमान स्पर्धक संख्या सर्वसाधारण गटासाठी 10 व आदिवासी गटासाठी 5 असावी, पीक स्पर्धेत सहभागी लाभार्थीचे शेतावर त्या पिकाखालील किमान 10 आर क्षेत्रावर सलग लागवड असणे आवश्यक आहे. याबाबत अधिक माहितीसाठी तालुका कृषी अधिकारी व कृषी अधिकारी, पंचायत समिती यांच्याशी संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने केले आहे.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
Z4 NEWS
मुख्य संपादक- उमेश राऊत
मो : 8411009377



