आपल्याला अशा प्रकारे जाहिरात करणे साठी संपर्क करा
महाराष्ट्र

मतदान कार्डसोबत आधार क्रमांकाची जोडणी करा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

जळगाव, 26 – भारत निवडणूक आयोगाच्या शिफारशीनुसार केंद्र शासन, विधी व मंत्रालय अधिसूचनेनुसार मतदान कार्ड आधार क्रमांकाशी संलग्न करण्यात येणार आहे. या सुधारणांची अंमलबजावणी दिनांक 1 ऑगस्ट, 2022 पासून लागू होणार आहे. तरी आधार क्रमांक मतदार कार्डशी जोडणे व प्रमाणिकरणासाठी राबविण्यात येणा-या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी मतदारांना केले आहे. या अनुषंगाने मतदार नोंदणी संबंधी नमुना अर्ज 1, 2 2 अ, 3,6,7, 8, 11, 11अ, 11ब, 18 आणि 19 मध्ये बदल करण्यात आलेले असून आधार क्रमांक संकलनासाठी अर्ज क्रमांक 6 ब निश्चित केला आहे. निवास स्थलांतरित करण्यासाठी विद्यमान मतदार यादीतील नोंदी दुरसत् करण्यासाठी / EPIC बदलण्यासाठी तसेच दिव्यांग मतदार चिन्हांकीत करण्यासाठी / नमुना अर्ज 8 वापरण्यात येणार आहे.

या कार्यक्रमांतर्गत 1 ऑगस्ट 2022 पासून 1 एप्रिल 2023 पर्यंत बीएलओ यांच्यामार्फत घरोघरी भेटी देवून व विशेष शिबिराच्या आयोजनाव्दारे मतदारांचे आधार क्रमांक फॉर्म क्रमांक 6 ब व्दारे जमा करण्यात येणार आहेत. प्रत्येक मतदारांकडून आधार क्रमांक विहीत स्वरुपात व विहितरितीने मिळविण्यासाठी वैधानिकरीत्या मतदार नोंदणी अधिकारी (ERO) यांना प्राधिकृत करण्यात आलेले आहे. याकामी मतदारांना अर्ज क्रमांक 6 ब च्या छापील प्रती उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तसेच मतदारांना ऑनलाईन पद्धतीने आधार क्रमांक भरण्यासाठी अर्ज क्रमांक 6 ब ERONET, GARUDA App. NVSP. VHP या पोर्टलचा देखील वापर करता येणार आहे.
मतदार यादीशी आधार क्रमांकाची जोडणी करणे मतदारांस ऐच्छिक आहे. तसेच मतदाराचा आधार क्रमांक गोपनीय ठेवण्यात येणार आहे. तथापि, आधारकार्ड उपलब्ध नसल्यास मतदारांना मतदार यादीतील नावाचे प्रमाणिकरण करण्यासाठी व दुबार नोंदी टाळण्यासाठी विहीत केलेल्या 11 कागदपत्रांपैकी 1 कागदपत्र सादर करणे आवश्यक आहे. ज्यामध्ये पासपोर्ट, वाहन चालक परवाना, छायाचित्रअसलेले शासकीय कर्मचारी ओळखपत्र, छायाचित्र असलेले बँकेचे, पोस्टाचे पासबुक, पॅनकार्ड, NPR अंतर्गत RGI व्दारे दिले गेलेले स्मार्ट कार्ड, मनरेगा कार्यपत्रिका. कामगार मंत्रालयाव्दारे दिले गेलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, छायाचित्र असलेले निवृतीवेतन दस्तावेज, खासदार, आमदार, विधान परिषद सदस्य यांना दिलेले ओळखपत्र, आधारकार्ड यांचा अंतर्भाव आहे, असे निवडणूक विभागाने कळवले आहे.

बातमी लाईक  करा,शेअर करा

खालील YouTube लिंक वर क्लिक करून  Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा  

https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber

Z4 NEWS
मुख्य संपादक- उमेश राऊत
मो : 8411009377

COMPLETE SOLUTION FOR YOUR NEED

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!