आपल्याला अशा प्रकारे जाहिरात करणे साठी संपर्क करा
आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्र

भारतीयांच्या रोमारोमात प्रखर राष्ट्रवाद : माजी सैनिक संभाजी पाटील यांचे प्रतिपादन


पाचोरा, दि.8 – “स्वातंत्र्य लढ्यातील अनेक ज्ञात-अज्ञात स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानाने देशाला स्वातंत्र्य मिळाले. पारतंत्र्याच्या जोखडातून मुक्त झालेला भारत सद्यस्थितीला अनेक शूर वीर भारतीय सैनिकांच्या बळावर सुरक्षित आहे. देशाच्या सीमेवर अहोरात्र सुरक्षा कवच देणाऱ्या सैन्यदला मुळेच देशातील सर्व व्यवहार सुरळीत असून तुम्ही मुलं भीतीमुक्त वातावरणात आनंदाने शिक्षण घेत आहेत. सैन्य दलाप्रमाणेच येथील प्रत्येक भारतीयाच्या रोमारोमात प्रखर राष्ट्रवाद व देशभक्ती दिसून येते.” असे प्रतिपादन माजी सैनिक संभाजी पाटील यांनी पाचोरा येथे केले.
“स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव 2022” यानिमित्ताने दि.8 ऑगस्ट रोजी येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक (मिठाबाई) कन्या विद्यालय व प्राथमिक विद्यामंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने “भारतीयांचा स्वातंत्र्यलढा व भारतीय सैन्य शक्ती”- या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. व्याख्यानाचे प्रमुख वक्ते माजी सैनिक संभाजीराव पाटील यांनी यावेळी विद्यार्थी-विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना वरील गौरवउद्गार काढले. यावेळी व्यासपीठावर प्राचार्य संजय पवार, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक पंडित कुंभार, पर्यवेक्षक सुवर्णसिंग राजपूत, माणिकराजे ट्रस्टचे संचालक प्रा. रवींद्र चव्हाण, ज्येष्ठ शिक्षिका प्रा.प्रतिभा परदेशी, प्रा शिवाजी शिंदे उपस्थित होते.

दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली. विद्यालया तर्फे उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.प्रमुख वक्ते माजी सैनिक संभाजी गंगाधर पाटील यांना सन्मानचिन्ह, शाल व गुलाब पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले. विद्यालयाचे प्राचार्य संजय पवार यांनी आपल्या प्रास्ताविकात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव बद्दल माहिती सांगितली. ज्येष्ठ शिक्षिका प्रतिभा परदेशी यांनीही आपले समयोचित मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते माजी सैनिक संभाजीराव पाटील यांनी आपल्या एक तासाच्या व्याख्यानात विद्यार्थ्यांना विविध राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय सैन्य शक्ति, यांसोबतच स्वातंत्र्य पूर्व इतिहास, स्वातंत्र्याचा इतिहास व विद्यमान भारतीय सैन्य शक्ती याबद्दल विद्यार्थ्यांना माहितीपूर्ण विवेचन केले. विविध विविध देशांच्या सैन्य शक्तीचा व युद्ध परिस्थितीचा तुलनात्मक अभ्यास करून भारतीय सैन्यदल आणि भारतीय समाजातील प्रखर राष्ट्रवाद यावर त्यांनी प्रकाशझोत टाकला.

प्रा. शिवाजी शिंदे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. आर. ओ.पाटील यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जयदीप पाटील, सुभाष जाधव, विजय पाटील अनिल पवार, निवृत्ती बाविस्कर, सुरेखा बडे, कल्पना पाटील, प्रतिभा पाटील, मनीषा कुंभार, आबाजी पाटील हिरालाल परदेशी धनराज धनगर आदी शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

बातमी लाईक  करा,शेअर करा

खालील YouTube लिंक वर क्लिक करून  Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा  

https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber

Z4 NEWS
मुख्य संपादक- उमेश राऊत
मो : 8411009377

COMPLETE SOLUTION FOR YOUR NEED

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: CALL ME 8411009377 \\\\