पाचोरा नगरपरिषदेकडून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त घरोघरी तिरंगा या कार्यक्रमाची जय्यत तयारी
पाचोरा, दि 8: भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर, जनतेच्या मनात या स्वातंत्र्य लढ्याच्या स्मुती तेवत राहाव्यात,स्वातंत्र्य संग्रामातील अज्ञात नायक/क्रांतीकारक स्वातंत्र्य संग्रामातील घडलेल्या विविध घटना यांचे स्मरण व्हावे, स्वातंत्र्यासाठी चेतवलेले स्फुलिंग कायम तेवत रहावे व देशभक्तीची जाज्वल्य भावना कायमस्वरूपी जनमाणसात रहावी, या उद्वेशाने देशात सर्वत्र “स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव” या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. “स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव” साजरा करण्यासाठी दि.९ ऑगस्ट २०२२ ते १७ ऑगस्ट २०२२ या कालावधीत पाचोरा नगरपरिषदेने पुढील प्रमाणे कृती आराखडा तयार करुन नियोजन केलेल्या तारखेस विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.शहरातील सर्व नागरिक तसेच सर्व संस्था /संघटना यांना स्वयंस्फुर्तीने सहभागी होण्यासाठी आवाहन करण्यात येत आहे.
कार्यक्रमाची रूपरेषा
*सकाळी 7-30 ते 8-45 एम.एम.कॉलेज च्या विद्यार्थ्यांची कॉलेज पासून आठवडे बाजार ते हुतात्मा स्मारक पासून एम.एम.कॉलेज पावेतो जनजागृतीपर सायकल रॅली.
*सकाळी 9-00 वाजता हुतात्मा स्मारक येथे हुतात्मांना वंदन व ध्वजारोहण.
- सकाळी 09.00 वाजता गांधी चौकातील हुतात्मा स्तंभ येथे शहिदांना मानवंदना
*सकाळी 9-15 ते 10-00 स्वातंत्र्य सैनिक / स्वातंत्र्याशी निगडीत जेष्ठ नागरीक किंवा त्यांचे वारस / माजी सैनीक यांचा गौरव तसेच.
*सकाळी 10-00 वा. नगरपरिषद कर्मचाऱ्यांची मोटरसायकल रॅली- हुतात्मा स्मारक ते एम.एम.कॉलेज ग्राऊंड येथे सकाळी 11-00 वा. शासकिय सामूहिक राष्ट्रगीत गायन.
*स.10-30 शहरातील हुतात्मा स्मारक येथे वृक्षारोपण.
( टीप– शहरात प्रत्येक प्रभागात सकाळी 11-00 वाजता घंटागाडी वरील स्पीकर द्वारे राष्ट्रगीत लावले जाईल. सर्व नागरिकांना विनंती आहे की, आहे त्या ठिकाणी उभे राहून राष्ट्रगीत गाऊन राष्ट्रगीताचा सन्मान करावा.)
१० ऑगस्ट २०२२ सकाळी 10-30 वाजेपासून नगरपरिषद कर्मचाऱ्यांमार्फत सार्वजनीक ठिकाणी उद्याने त्याच प्रमाणे शॉपींग सेंटर परिसरात विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे.
ऑगस्ट २०२२ रोजी स.11-30 वा. शहरातील बचत गटातील महिलांकरीता मेळावा आयेाजीत करुन गटाने तयार केलेल्या वस्तूंचा बाजारपेठ कशी मिळावावी? याबाबत बॅकाकंडून अर्थसहाय्य कसे मिळेल? याबाबत बॅक ऑफ महाराष्ट्र मधील मॅनेजर यांचे मार्गदर्शन तसेच NULM व PM स्वनिधी योजनेअंतर्गत उत्कृष्ठ काम करणाऱ्या गटांना प्रमाणपत्र वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.
त्याच प्रमाणे पाचोरा शहराचा इतिहास ,राष्ट्राचा इतिहास ,मागील काळातील गावाविषयी माहिती, शहरातील कलाकार, खेळले जाणारे खेळ, सण, उत्सव, परंपरा, रात्रोत्सव, अर्थकारण बाबत माहिती.
*१२ ऑगस्ट २०२२ सकाळी 11 वाजता मोबाईलचे दुष्परिणाम मार्गदर्शन-चर्चा, ऑनलाईन फसवणूक, ब्लॅकमेलिंग, आर्थिक फसवणूक याबाबत विविध शाळांमध्ये मार्गदर्शन केले जाणार आहे.
*१२ ऑगस्ट २०२२ वेळ- सकाळी 11-00 वाजता शहरातील महिला यांच्यासाठी अर्थ साक्षरता,बचतीचे महत्व online खरेदी, फसवणुका या बाबत बॅकेच्या अधिकाऱ्यांमार्फत मार्गदर्शक शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
*१४ ऑगस्ट २०२२ स.11-00 वा. पर्यावरण संवर्धन व प्लास्टिक बंदी बाबत न.पा.कार्यालयील अधिकारी / कर्मचारी व नागरीक व विद्यार्थी यांचे मार्फत सामुहीक शपथ घेण्याचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आलेला आहे.
*१४ ऑगस्ट २०२२ रोजी शहरातील खुल्या जागा, रस्त्याच्या कडेला पारंपारीक जातीच्या रोपे लागवडीचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.
15 ऑगस्ट 2022 रोजी स.7-30 वाजता न.पा.कार्यालय येथे ध्वजारोहणाचा कार्यक्रम
*स.7-30 ते 7-40 न.पा.कार्यालय ते हुतात्मा स्मारक पावेतो नगरपरिषद कर्मचाऱ्यांची प्रभातफेरी
*स.7-45 हुतात्मा स्मारक येथे नगरपरिषदेमार्फत ध्वजारोहण
*स.7-50 ते 8-30 हुतात्मा स्मारक ते छत्रपती संभाजी राजे चौकापावेतो प्रभात फेरी.
*स.08-30 वा नगरपरिषदेमार्फत राजे संभाजी चौकात उभारण्यात आलेल्या 75 फुटी राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण.
*१५ ऑगस्ट २०२२ स्वातंत्र्य दिनाच्या दिवशीच शालेय विद्यार्थ्यांकरीता शहरातील विविध शाळेमार्फत स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
*१६ ऑगस्ट २०२२ रोजी शहरातील अंगणवाडी सेविका,मदतनीस,आशा वर्कर व वैद्यकीय सेवेशी संबंधित तज्ञ यांच्या सहभागातून किशोरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे.
*१६ ऑगस्ट २०२२ रोजी सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे प्रबोधन त्यात देशभक्तीपर कार्यक्रम शहरातील शाळा, महाविद्यालयामार्फत घेण्यात येणार आहे.
*१७ ऑगस्ट २०२२ वेळ स.11-00 वा स्वराज्य महोत्सवाची सांगता करतांना विद्यार्थ्यांची स्वराज्य फेरी तसेच शाळेतील विद्यार्थ्यांकरिता देशमुखवाडी भागातील प्रकाश टॉकीज येथे देशभक्तीपर चित्रपट दाखविण्यात येणार आहे.
तसेच या सर्व समारोहाचा गाभा आणि आत्मा म्हणजे दिनांक 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट 2022 पावेतो *घरोघरी तिरंगा* फडकविणे हा कार्यक्रम शासनाने दिनांक 13 ते 15 ऑगस्ट 2022 पावेतो शहरातील प्रत्येक घरी तिरंगा लावणे बाबत सर्व नागरीकांना विविध सामाजीक संस्था/ संघटना, विद्यार्थी संघटना, मार्फत या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमाची जनजागृती करण्यात येत आहे. तसेच सर्व नागरिकांनी स्वयंस्फुर्तीने सहभागी होऊन राष्ट्रनिर्मीतीच्या या अनमोल कार्यात बहुमोल योगदान देऊन या अभुतपुर्ण सोहळयाचे साक्षीदार होऊया. तसेच दिनांक 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट 2022 पावेतो प्रत्येक घरी तिरंगा या मोहमेकरीता तिरंगा ध्वज हा नगरपरिषद कार्यालय, राजे संभाजी चौक, छ.शिवाजी महाराज चौक विक्रीसाठी उपलब्ध इतर ठिकाणी नाममात्र दरात विक्रीकरीता उपलब्ध असतील. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवा निमित्त घरोघरी तिरंगा हा प्रेरणादायी कार्यक्रम यशस्वी करण्याबाबतचे आवाहन मुख्याधिकारी तथा प्रशासक श्रीमती.शोभा बाविस्कर यांनी केले आहे.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
Z4 NEWS
मुख्य संपादक- उमेश राऊत
मो : 8411009377