श्री.गो.से.हायस्कुल मध्ये स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त ध्वजारोहण व विविध सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न
पाचोरा, दि.15- पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री. गो.से.हायस्कुल, पाचोरा या विद्यालयात संस्थेचे अध्यक्ष तथा माजी आमदार मा.भाऊसाहेब श्री. दिलीप ओंकार वाघ यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी शालेय समिती चेअरमन मा.दादासाहेब श्री.खलील देशमुख, तांत्रिक विभाग चेअरमन मा.आण्णासाहेब श्री.वासुदेव महाजन, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ.पी.एम.वाघ, पर्यवेक्षक श्री.आर.एल.पाटील, श्री.एन. आर.ठाकरे, श्री.ए.बी.अहिरे, तांत्रिक विभाग प्रमुख श्री. एस.एन.पाटील, किमान कौशल्य विभाग प्रमुख श्री.एम.बी.बाविस्कर, कार्यालयीन प्रमुख श्री.ए.बी.सिनकर, सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री.आर.बी.तडवी तसेच माजी मुख्याध्यापक श्री.एस. डी.पाटील, श्री.बी.डी.बोरुडे, माजी पर्यवेक्षक श्री.शांताराम चौधरी, श्री.ए.जे.महाजन,श्री. पी.जे.पाटील, सौ.पी.पी.पाटील, सौ.सी. एस. धुळेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
ध्वजारोहणानंतर विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते, नृत्य, नाटिका ई.विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते गरजू, गरीब व हुशार विद्यार्थ्यांना शालेय गणवेश वाटप करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांची रॅली हातात तिरंगा ध्वज व वंदे मातरम च्या घोषणा देत उत्साहात संपन्न झाली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक बंधूनी सहकार्य केले, या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्री. आर. बी. बोरसे यांनी केले.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
Z4 NEWS
मुख्य संपादक- उमेश राऊत
मो : 8411009377