गुरूकुल इंटरनॅशनल स्कूल पाचोरा येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवा निमित्त भव्य रॅली
पाचोरा- स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवा निमित्त गुरुकुल इंटरनॅशनल स्कूल पाचोरा येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी भारत माता प्रतिमा यांचे पूजन स्वातंत्र्य सेनानी श्री वसंतराव माधवराव पाटील प्राचार्य प्रेम शामनाणी व अन्य मान्यवरांच्या हस्ते झाल्यानंतर ध्वजारोहण करण्यात आले.
विद्यार्थ्यांनी देशभक्तीवर भाषण, वेशभूषा स्पर्धा, देशभक्ती गीत व विविध सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेतला. त्यानंतर विद्यार्थ्यांसोबत पालकांचा समावेश असलेली भव्य रॅली शाळेतून काढण्यात आली. रॅलीमध्ये विद्यार्थ्यांनी तिरंगा झेंडा सोबत विविध हात फलक घेऊन देश प्रेमा संबंधी घोषणा केली. तसेच रॅलीत डंबेल्स, रींग्ज, लेझिम व विद्यार्थ्यांसोबत विद्यार्थिनीचे चालते मानवी मनोरे (Pyramids) ने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. विशेष म्हणजे रॅलीतील विद्यार्थांसाठी नवजवान सेवा मंडळातर्फे अल्पोहाराची व्यवस्था करण्यात आली. त्यानंतर मंडळाचे सर्व सदस्य व परिसरातील महिला व पुरुषही रॅलीत सहभागी झाले. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्वातंत्र्य सेनानी श्री. वसंतराव माधवराव पाटील. श्री. हरिभाऊ पाटील, श्री. बापू हटकर, भारतीय सिंधू सभा व नवजवान सेवा मंडळाचे सर्व सदस्य यांची उपस्थिती लागली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. बोहरा मॅम, सौ. लहाने मॅम व सौ. कल्पना वाणी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री. अंकुश शामनाणी, निखिल सर, क्रीडा शिक्षक श्री. दिलीप चौधरी सर व सर्व शिक्षकांचे योगदान लाभले.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
Z4 NEWS
मुख्य संपादक- उमेश राऊत
मो : 8411009377