आपल्याला अशा प्रकारे जाहिरात करणे साठी संपर्क करा
महाराष्ट्र

विविध क्षेत्रात अति उत्कृष्टकार्य करणाऱ्यांना विशेष गौरव पुरस्कार


जळगाव दि.30 – राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणा-या, देश, राज्याची प्रतिष्ठा वाढवतील अशा स्वरुपाचे लक्षणीय काम करणाऱ्या माजी सैनिक, पत्नी, पाल्य तसेच सामाजिक कार्य आणि पर्यावरणविषयक पुरस्कार मिळवणारे आणि शैक्षणिक वर्ष 2021-22 मध्ये इ. 10 वी व इ. 12 वी बोर्डात 900 पेक्षा अधिक गुण मिळवलेल्या तसेच पदवी किंवा पदव्युत्तर परीक्षेत विद्यापीठात सर्वप्रथम क्रमांकाने उत्तीर्ण आयआयटी, आयआयएम व एम्स अशा नामवंत व ख्यातीप्राप्त संस्थामध्ये प्रवेश मिळालेल्या माजी सैनिक पाल्यांना सैनिक कल्याण विभागाकडून विशेष गौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.
या विशेष गौरव पुरस्कार योजनेसाठी पात्र असलेल्या माजी सैनिक, पत्नी पाल्यांनी जिल्हा सैनिक कार्यालयात उपलब्ध असलेले कागदपत्रांसाठी 20 सप्टेंबर,2022 पर्यंत कार्यालयात संपर्क साधावा.
ओळखपत्राची छायांकित प्रत, 10 वी , 12 वी बोर्डाच्या परीक्षेच्या गुणपत्रिकेची छायांकित प्रत, चालू वर्षी शिकत असल्याचे बोनाफाईड सर्टिफिकेट, डिस्चार्ज पुस्तकात कुटुंबाची नावे असलेल्या पानाची छायांकित प्रत, आर्थिक मदतीच्या हिरव्या कार्डची छायांकित प्रत, राष्ट्रीयकृत बँक पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत व आधार कार्डची छायांकित प्रत तसेच इतर क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दलचे प्रमाणपत्र अर्जासोबत जोडावेत. या संधीचा जास्तीत जास्त लाभ माजी सैनिकांनी घ्यावा, असे आवाहनही जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने केले आहे.


बातमी लाईक करा शेअर करा

खालील YouTube लिंक वर क्लिक करून  Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा  

https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber

बातमी व जाहिराती साठी संपर्क
Z4 NEWS,मुख्य संपादक- उमेश राऊत
मो : 8411009377

COMPLETE SOLUTION FOR YOUR NEED

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!