माजी सैनिक विधवांच्यापाल्यांसाठी विशेष गौरव पुरस्कार
जळगाव दि.30 – शैक्षणिक वर्ष 2021-22 मध्ये इ.10 वी व 12वी बोर्डाच्या परीक्षेत सर्वाधिक गुण प्राप्त करून उत्तीर्ण झालेल्या माजी सैनिक विधवांच्या पाल्यांना एअर मार्शल व्ही.ए.पाटकर विशेष गौरव पुरस्कार निवडीसाठी 20 सप्टेंबरपूर्वी अर्ज सादर करावा. जास्तीत जास्त माजी सैनिक विधवांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.
अर्जासोबत डी.डी., चालू वर्षी शिकत असल्याचे बोनाफाईड सर्टिफिकेट, 10 वी, 12 वी बोर्डाच्या परीक्षेच्या गुणपत्रिकेची व बोर्डाचे सर्टिफिकेटची छायांकित प्रत, ओळखपत्राची छायांकित प्रत, आर्थिक मदतीच्या हिरव्या कार्डची छायांकित प्रत, राष्ट्रीयकृत बँक पहिल्या पानाची छायांकित प्रत व आधार कार्डची छायांकित प्रत जोडावी, असेही त्यांनी कळविले आहे.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscribe
बातमी व जाहिराती साठी संपर्क
Z4 NEWS
मुख्य संपादक- उमेश राऊत
मो : 8411009377