आगामी निवडणुकांसाठी शिवसेनेचे(शिंदे गट) जिल्हापरिषद गटनिहाय मेळावे

पाचोरा, दि.३१ -आगामी काळात होणार्या निवडणुकांच्या पाश्वभुमिवर पक्षसंघटन मजबुत करण्यासाठी १ सप्टेंबर ते ६ सप्टेंबर या कालावधित शिवसेनेचे आमदार किशोर पाटिल यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हापरिषद गटनिहाय मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले आहे.
येणार्या काळात होऊ घातलेल्या जिल्हा परिषद,पंचियत समीती,कृषी उत्पन्न बाजार समीती,शेतकरी सहकारी संघ व नगरपालिका या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकिच्या पाश्वभीमिवार शिवसेना पक्ष संघटन मजबुत करण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी आमदार किशोर पाटिल यांच्या अध्यक्षतेखाली पाचोरा तालुक्यातिल पाचही जिल्हापरिषद गटनिहाय मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले असुन या मेळाव्यास प्रमुख मार्गदर्शक म्हणुन शिवसेना जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटिल,विधानसभा क्षेञप्रमुख अविनाश कुढे,तालुका प्रमुख सुनिल पाटिल,युविसेना तालुका प्रमुख योगेश पाटिल,माजी जि.प. सदस्य पदमसिंग पाटिल,माजी नगरसेवक डाॅ.भरत पाटिल,माजी पंचायत समीती सभापती अणिल पाटिल,पाचोरा नगरपालिका माजी उपनगराध्यक्ष गणेश पाटिल,माजी.बाजार समीती संचालक पंढरी पाटिल,पाचोरा शहरप्रमुख किशोर बारावकर,बंडु चौधरी यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
या जिल्हापरिषद गटनिहाय मेळाव्यांचा श्रीगणेशा १ सप्टेंबर रोजी नगरदेवळा —बाळद गटाचा मेळावा चौधरी समाज मंगल कार्यालयात होउन होणार आहे. २ सप्टेंबर रोजी पिंपळगाव —शिंदाड गटाचा मेळावा माळी समाज मंगल कार्यालय पिंपळगाव (हरे.) येथे होणार आहे. ३ सप्टेंबर रोजी लोहटार—खडकदेवळा गटाचा मेळावा नाथ मंदिर जारगाव येथे होणार असुन ४ सप्टेंबर रोजी बांबरूड —कुरंगी गटाचा मेळावा नांद्रा येथे टेकडीवर घेण्यात येणार आहे.तर ६ सप्टेंबर रोजी लोहारा—कुर्हाड गटाचा मेळावा माळी समाज मंगल कार्यालय कुर्हाड येथे होणार असुन या मेळाव्यात सर्व शिवसैनिक,पदाधिकारी,लोकप्रतिनीधी यांनी उपस्थीती द्यावी असे अवाहन शिवसेना जिल्हा प्रमुख रावसाहेब पाटिल, तालुका प्रमुख सुनिल पाटिल,युवासेना तालुका प्रमुख योगेश पाटिल,शहरप्रमुख किशोर बारावकर,बंडु चौधरी यांनी केले आहे.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
Z4 NEWS
मुख्य संपादक- उमेश राऊत
मो : 8411009377



