लंपी रोगाचा प्रसार होऊ नये यासाठी तात्काळ प्रतिबंधात्मक उपाय योजना अमलातआणा-जिल्हाधिकारी अभिजित राऊत
जळगाव,दि १२– जिल्ह्यातील 8 तालुक्यातील 29 ठिकाणी जनावरांमध्ये लंपी स्किन डीसीज (Lumpy Skin Disease) आढळून आला आहे. या रोगाचा प्रसार निरोगी पशुधनास होण्याची शक्यता नाकारता येत नाही. हा आजार विषाणुजन्य आणि सांसर्गिक असल्याने या रोगाचा प्रसार होउ नये म्हणून प्रतिबंधात्मक उपाययोजना तात्काळ अंमलात आणण्याचे निर्देश
जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अभिजीत राऊत यांनी दिले.
संक्रमण व सांसर्गिक रोग प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम 2009 नुसार पशुधनातील लम्पी स्किन या रोगाचे प्रतिबंध नियंत्रण व निमूर्लन करण्यासाठी खालील प्रमाणे निर्देश देण्यात आले आहेत.
१. जनावरांची खरेदी विक्री साठीचे जळगाव जिल्ह्यातील गुरांचे सार्वजनिक बाजार पुढील आदेश होईपर्यंत बंद ठेवण्यात यावे जिल्हयातील इतर राज्यामधुन आंतरराज्य सिमेवरुन पशुधनाची होणारी वाहतुक बंद ठेवण्यात यावी त्याकरीता जिल्हा पोलिस प्रशासन व उपप्रादेशिक परिवहन विभाग यांनी आंतरराज्य सीमेवरील चेक नाक्यावर कसुन तपासणी करावी.
२. पशुधन एकत्र येतील असे सार्वजनिक चराई व सार्वजनिक गुरांसाठीचे पाणी पिण्याचे सार्वजनिक हौद पुढील 15 दिवस बंद ठेवण्यात यावे.
३.ह्या रोगाचा प्रसार बाहय किटकांव्दारे ( डास, माश्या, गोचीड इत्यादी) होत असल्याने आजारी नसलेल्या सर्व जनावरांवर तसेच गोठयात बाहय किटकांच्या निर्मुलनासाठी ग्रामपंचायतीनी पशुसंवर्धन विभागाच्या सहकार्याने औषधांची फवारणी करावी.
४. बंदिस्त परिसरात गोठा स्वच्छता तसेच निर्जंतुक द्रावणाची फवारणी करावी.
५. ग्रामपंचायतीनी पशुधन मृत झाल्यास त्याची शास्त्रीय पध्दतीने विल्हेवाट लावण्यासाठी 4 बाय 8 फुट आकाराचे खड्डे करण्याची व्यवस्था करावी. सदर व्यवस्था ग्रामपंचायत स्तरावर शक्य् नसल्यास गट विकास अधिकारी यांचे मार्फत बांधकाम विभाग पंचायत समिती किंवा सार्वजनिक बांधकाम विभागाकडून खड्डे करण्याची व्यवस्था करावी. पशुधन विकास अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली शास्त्रोक्त पध्दतीने मृत पशुधनाची विल्हेवाट लावावी.
५.सर्व खाजगी पदविकाधारक यांनी / पशुपालकांनी LSD आजाराची माहिती शासकीय पशुवैदयकीय संस्थेस देणे बंधरकारक आहे. LSD आजराचे उपचार पशुधन विकास अधिकारी किंवा त्यांचे मार्गदर्शनानुसारच करण्यात यावे. ६.खाजगी पदविकाधारक यांनी LSD चे परस्पर उपचार केल्यास कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल.
जळगाव जिल्हयातील सर्व पशुवैदयकिय संस्थांनी LSD उपचारासाठी आवश्यक सर्व औषधी वरिष्ठांशी चर्चा करुन उपलब्ध करुन घेण्यात याव्यात.असे जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण जळगाव अभिजीत राऊत यांनी कळविले आहे.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS
मुख्य संपादक- उमेश राऊत
मो : 8411009377