आपल्याला अशा प्रकारे जाहिरात करणे साठी संपर्क करा
महाराष्ट्र

राज्याचे विरोधी पक्ष नेते ना.अजितदादा पवार दि.१५ रोजी पाचोऱ्यात येणार

पाचोरा, दि.12 – पाचोरा भडगाव मतदारसंघात मा, आ.दिलीप वाघ यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीचा कार्यकर्ता मेळावा १५ सप्टेंबर २०२२ रोजी एम. एम. कॉलेजच्या प्रागंणात,आयोजित केला आहे,या मेळाव्याचे उद्घाटक व प्रमुख मार्गदर्शक महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्ष नेते मा.ना. अजितदादा पवार हे असणार असल्याची माहिती आज मा.आ.दिलीप वाघ यांनी त्यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषदेत दिली, या वेळी राष्ट्रवादी चे जिल्हाध्यक्ष ऍड रवींद्र भय्या पाटील न.पा.गटनेते संजय वाघ विधानसभा क्षेत्र प्रमुख नितीन तावडे पाचोरा शहर अध्यक्ष अझर खान शहरअध्यक्ष भडगांव) शामकांत भोसले हे उपस्थित होते. पत्रकार परिषदेत मा .दिलीप वाघ बोलताना म्हणाले की राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था सार्वत्रीक निवडणुका जवळ येत आहे, या निवडणुका जिकण्यासाठी राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी मजबूत करण्यासाठी कार्यकर्ता मेळावा आयोजित केला जात.असून या मेळ्यात राज्याचे विरोधी पक्ष नेते ना अजितदादा पवार हे येत आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीचे माजी प्रेदश अध्यक्ष अरुणभाई गुजराथी असणार आहे. सोबत विधान परिषदेचे आमदार व माजी मंत्री एकनाथरावजी खडसे येणार आहे. विशेष अतिथी मध्ये मा.आ.डॉ. सतिष आण्णा पाटील माजी पालकमंत्री, काकासो. वसंतराव मोरे माजी खासदार, मा. राजीवदादा देशमुख माजी आमदार चाळीसगांव, मा.अविनाशजी आदिक निरीक्षक जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी, मा.गुलाबरावजी देवकर माजी पालकमंत्री ,मा. अनिल भाईदास पाटील आमदार अमळनेर ,मा.आ. दिलीप ओंकार वाघ मा.आमदार पाचोरा भडगांव तर प्रमुख पाहूणे मा. अॅड. रविंद्र भैय्या पाटील जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी ,मा. मनिष ईश्वरलाल जैन माजी आमदार विधानपरिषद ,मा.विलास भावलाल पाटील जिल्हा कार्याध्यक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी ,मा. दिलीप तात्या सोनवणे माजी आमदार विधानपरिषद, मा. एजाजभाई मलिक जिल्हा सरचिटणीस राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी ,मा. अरुण दादा पाटील माजी आमदार रावेर ,मा. रविंद्र नाना पाटील जिल्हाध्यक्ष युवक राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी ,मा. संतोषभाऊ चौधरी माजी आमदार भुसावळ,
मा. सौ. वंदनाताई चौधरी महिला आघाडी जिल्हाध्यक्षा,
मा. योगेश देसले प्रदेश प्रवक्ता राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी,
मा. अरविंद मानकरी जिल्हाध्यक्ष सामाजीक न्याय,
मा. सौ. रोहिणीताई खडसे-खेवलकर जिल्हा कार्याध्यक्ष शैक्षणीक संस्था जळगांव, मा.दादासो. संजय गरुड जेष्ठ नेते, राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी ,मा.नानासो, संजय ओंकार वाघ गटनेते पाचोरा न.पा.असणार आहे.या मेळाव्याचे
विनीत म्हणून नितीन कैलास तावडे (विधानसभा क्षेत्र )अध्यक्ष, राहूल पाटील तालुका अध्यक्ष भडगांव ,विकास पाटील पाचोरा तालुका अध्यक्ष, हर्षल पाटील कार्याध्यक्ष भडगांव ,स्वप्नील पाटील यु.ता.अ.भडगांव ,दिदेक पवार शहरअध्यक्ष युवक भडगांव ,सौ. रेखाताई पाटील ता.अ.म.आ. भडगांव ,सौ. हर्षदाताई पाटील शहराध्यक्षा भडगांव, कु. दक्षता पाटील युवती ता.अध्यक्षा भडगांव,
विलास भामरे कार्याध्यक्ष पाचोरा ,अभिजीत पवार ता.यु. अ. पाचोरा ,सुदर्शन सोनवणे यु.ता.अ.पाचोरा, सौ.रेखाताई देवरे ता.अ.म.आ.पाचोरा, सौ.सुनीताताई देवरे शहराध्यक्षा पाचोरा ,अभिलाषा रोकडे युवती ता.अध्यक्षा पाचोरा,सर्व सेलचे पदाधिकारी पाचोरा भडगांव राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी हे असणार आहे. या मेळाव्यात आधी एम एम कॉलेज येथे जिजाऊ रंगमंच इमारती चे उद्घाटक होणार आहे, तर या मेळाव्यात पाचोरा भडगाव मतदारसंघातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष ऍड रवींद्र भय्या पाटील यांनी केले आहे.

बातमी लाईक  करा,शेअर करा

खालील YouTube लिंक वर क्लिक करून  Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा  

https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber

बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS
मुख्य संपादक- उमेश राऊत
मो : 8411009377

COMPLETE SOLUTION FOR YOUR NEED

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: CALL ME 8411009377 \\\\