पाचोरा दि.12- राज्याचे माजी उपमुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते अजित दादा पवार हे जळगाव जिल्हा दौऱ्यावर दिनांक 15 सप्टें .रोजी येत असून सकाळी 10 वाजता पाचोऱ्यात त्यांचे आगमन होणार असून त्या निमित्ताने पाचोरा येथे विविध उद्घाटन व कार्यकर्ता मेळावा होणार आहे .त्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांशी हितगुज करण्यासाठी आढावा बैठक मालपुरे मंगल कार्यालय येथे दुपारी दोन वाजता संपन्न झाला यावेळी जिल्हाध्यक्ष रवींद्र भैया पाटील. यांच्या अध्यक्ष खाली व माजी आमदार दिलीप वाघ यांच्या प्रमुख उपस्थितीत मिळाल्यास सुरुवात झाली यावेळी पाचोरा भडगाव शहर व तालुक्यातील सर्व खेळातील कार्यकर्ते पदाधिकारी विविध सेलचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी माजी आमदार भाऊसाहेब दिलीप वाघ यांनी कार्यकर्त्यांशी बोलताना सांगितले की, राज्यामध्ये सत्तांतर झाल्यानंतर राजकीय परिस्थितीमध्ये फार मोठा बदल झालेला आहे त्यानुसार होणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीसाठी संस्थांच्या निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांनी पक्ष संघटनेसाठी दोन दिवस महिन्यातून द्यावे पक्ष संघटन मजबूत होण्यासाठी आणि महाआघाडी सरकारने केलेल्या कार्याचा प्रचार प्रसार होण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रत्येक गावात आणि शहरातील घरापर्यंत पोहोचून पक्षाचे ध्येय धोरण व कार्य समजून सांगणे गरजेचे आहे त्यानुसारच कार्यकर्ते जोडून एकत्र येतील व पक्ष संघटना मजबूत होईल यासाठी मी आपल्यासाठी केव्हाही आपल्या मदतीला मतदारसंघासाठी येण्यास तयार आहे प्रथम आपला विजय झाल्यानंतरच माझा विजय होण्यासाठी हातभार लागेल म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांना विजयी करणे हे माझे व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ध्येय धोरण आहे त्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी आपसातील मतभेद विसरून एक जमाने एक दिलाने एकत्र येऊन कार्य करावे असे आवाहन केले.व दिनांक 15 रोजी विरोधी पक्षनेते नामदार अजितदादा पवार यांचा पाचोरा भडगाव दौरा व कार्यकर्ता मेळावा यशस्वी करण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात उपस्थितीचे राहण्याचे आवाहन त्यांनी या निमित्ताने केले. यावेळी जिल्हाध्यक्ष रवींद्र भैय्या पाटील यांनीही कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करून जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे . याप्रसंगी नितीन तावडे, खलील देशमुख, शालिग्राम मालकर ,हर्षल पाटील ,विकास पाटील, यांनी मनोगत व्यक्त करून केले मेळावा यशस्वी करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचे आवाहन केले यावेळी व्यासपीठावर पि.टी.सी .चेअरमन संजय नाना वाघ. डॉक्टर संजय पाटील हर्षल पाटील अभिजीत पाटील शालिकराम मालकर नितीन तावडे विकास पाटील खलील देशमुख व पाचोरा भडगाव विविध सेलचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS
मुख्य संपादक- उमेश राऊत
मो : 8411009377