आपल्याला अशा प्रकारे जाहिरात करणे साठी संपर्क करा
महाराष्ट्र
Trending

जनता जनार्दन आहे सत्तेचा राजा योग्य निवडेल – मा.अजीत पवार यांचे पाचोरा मेळावा प्रसंगी प्रतिपादन

पाचोरा –पाचोरा येथील राष्ट्रवादी कार्यकर्ता मेळावा प्रसंगी विरोधी पक्ष नेते अजीत पवार यांनी विविध मुद्यानवर सरकारला धारेवर धरले

राष्ट्रवादीचा पाचोरा भडगाव कार्यकर्ता मेळावा नुकताच दिनांक 15 सप्टेंबर रोजी संपन्न झाला.पाचोरा भडगाव विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा कार्यकर्ता मेळावा तसेच येथील श्री गो से हायस्कूल पाचोरा येथील जिजाई रंगमंचाचे उद्घाटन व पाचोरा एम एम कॉलेज येथे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ अभ्यासकेंद्र या इमारतिचे उद्घाटन करण्यात आले.या निमित्ताने राष्ट्रवादी चे संपूर्ण जळगाव जिल्ह्यातील आमदार व पदाधिकारी, कार्यकर्ते या मेळाव्यास उपस्थित होते.अजितदादा पवार यांचे पाचोरा शहरात साधारण तीन वर्षानंतर कार्यक्रम घेण्यात आला. 50 खोके एकदम ओके हा डायलॉग आज सबंध देशासह विदेशातही सुप्रसिद्ध झालेला आहे .खोके हा शब्द आज जगाच्या डिक्शनरीत कोणत्या अर्थाने नोंद झाला असेल तर याचे उदाहरण म्हणजे नुकताच सत्तांतर झालेली घटना आणि त्या अनुषंगाने सर्वसामान्य माणसाच्या मनातून निघालेल्या उद्दीग्न प्रतिक्रिया तसेच सुरत ते गुहाटी पर्यंत पक्षांतर केलेल्या आमदारांचा प्रवास तेथील त्यांचे राहणे आणि त्या वास्तव्यातून मंथन होऊन निघालेले काय झाडी काय डोंगर काय हॉटेल यासह अनेक स्लोगन या सत्तांतरामधून आपणास बघावयास मिळाले.

नुकत्याच जी तात्कालीन घटना घडली ती म्हणजे जळगाव एलसीबी चे पि.आय. किरण बकाले यांनी जे आक्षेपार्ह स्टेटमेंट केले त्याबाबत अजित दादा पवार यांनी सदर व्यक्तीला बडतर्फ़ करण्यात यावे या शिवाय त्याच्या दहा पिढ्या लक्षात ठेवतील अशी त्याची अवस्था करावी किंबहुना त्याला अद्दल घडावी कुठल्याही समाजाविषयी असे वक्तव्य महाराष्ट्रात खपवून घेतल्या जाणार नाही आता बघतो मी मुख्यमंत्री साहेब यावर काय उपाययोजना करतात परंतु त्याला जोपर्यंत संपूर्ण शिक्षा होत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही असे तिखट शब्दात त्यांनी घणाघात केला.अजितदादा यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर लक्ष वेधीत जे शेतीपूरक औषधे मटेरियल आधी कमी भावात मिळत होते त्याचे रेट आज दुपटीने वाढलेले आहेत अनेक शेतकऱ्यांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे खतांच्या किमती प्रचंड प्रमाणात वाढले आहे आज कांदा उत्पादक शेतकरी त्याला दोन पैसे लाभाचे मिळणार होते परंतु काय गडबड झाली की आज शेतकऱ्याच्या हातात तोंडी आलेला घासही हिरावल्या जात आहे.शेतकरी हवालदील झालेला आहे तो न्यायच्या अपेक्षित आहे परंतु त्याची दखल आज राज्य सरकार घेत नाही.ज्या प्रकारे महाराष्ट्रात हे सरकार स्थापन झाले परंतु या भाजप व शिंदे गटाच्या सरकारमधील मंत्र्यांनी अजूनही खात्यांचा अधिभार स्वीकारलेला नाही याचे मूळ कारण त्यांना ते खाते नको असून त्यांच्या मनापासून जे खाते हवे आहे ते भेटावे असे. माजी कृषी मंत्री दादा भुसे यांची टिंगल उडवत सदर व्यक्तीने कृषी खाते नाकारण्याचे कारण हे हसण्याजोगे असून मुळात त्यांना ते दिले गेले नाही त्यामुळे तेही नाराज आहे शिवाय इतरही मंत्री जे सत्तेच्या लोभापाई गेले त्यांनाही अजून मंत्रिमंडळात स्थान मिळत नसून जे मंत्रिमंडळात आहे त्यांनाही पालकमंत्री पद दिले नसल्याने अनेक कामे रखडली जात आहे. याचा विस्तार लवकर करून जनतेची कामे मार्गी लागावीत असेही त्यांनी बोलून दाखवले.

यानंतर त्यांनी वेदांता-फॉक्सकॉन हा प्रोजेक्ट महाराष्ट्र सरकारने गुजरात मध्ये का जाऊ दिला यात साधारण दोन लाख कोटींची गुंतवणूक होणार होती एवढा मोठा प्रोजेक्ट बाहेर जाणे म्हणजे राज्याच्या प्रगतीवर त्याचा दुष्परिणाम होण्यासारखे आहे .यावर पुढे भाष्य करताना त्यांनी सरकारवर टीका केली शिंदे यांना केंद्र गाजर दाखवत आहे या पेक्षाही मोठा प्रोजेक्ट मिळेल अशी त्यांना कुल्फी देण्यात आली आहे परंतु हातचे सोडून पळत्याच्या पाठीमागे धावण्यात मजा नसून जे प्रोजेक्ट आज जात आहे ते थांबवणे गरजेचे आहे अन्यथा येथील युवक-युवतींना भविष्यात बेरोजगारीला सामोरे जावे लागेल एका उद्योगावर अनेक छोटे छोटे स्मॉल स्केल इंडस्ट्रीज हे अवलंबून असतात व त्या सभोवताली रोजगार मिळत असतो याचाही विचार सरकारने करायला हवा होता.आजच्या युवक युवकांनी या संदर्भात आता पेटून उठायला हवे अन्यथा बेरोजगारीच्या भस्मासुराला सामोरे जावे लागेल.

आपला भाषणातून अजितदादांनी सध्या परिस्थितीत असलेल्या शैक्षणिक गुणवत्तेबाबत मार्गदर्शन करताना सर्वांगीण विकास करावा कलाक्षेत्र असो क्रीडाक्षेत्र असो सर्व बाबतीत आता जे मेरिटमध्ये असतील तेच पुढे जातील कारण कॉम्पिटिशन ही खूप वाढलेली आहे गुणवत्ता,दर्जेदार शिक्षण,ज्ञान आत्मसात करावे तरच आपण पुढील काळात टिकू शकतो, आता वशिल्याचे दिवस संपले असून सर्व काही आता मेरिट प्रमाणे होत आहे.त्यामुळे जास्तीत जास्त ज्ञान आत्मसात करणे ही आता काळाची गरज झालेली आहे शैक्षणिक संस्था चालवताना संस्थाचालकांनी बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागत असते परंतु या सगळ्यातूनही ते मार्ग काढून दर्जेदार शिक्षण देण्याचा प्रयत्न करीत असतात असेही त्यांनी आपल्या भाषणात नोंद केले

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घटना दिली त्यांनी दिलेला कायदा त्यांनी दिलेले नियम कुठे बाजूला ठेवायचे हे चित्र सध्या आपल्याला देशातल्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये बघायला मिळते आहे. जनता जनार्दनाच्या मनामध्ये जे आहे ते जनता, मतदार राजा करेल जो योग्य त्याला निवडून देईलहे विषद केले .आज सबंध देशात जे फोडाफोडीचे राजकारण होत आहे त्याने नक्कीच देशाची प्रगती होणार नाही. ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद अशा ठिकाणी जर काम न करता सदस्यांना फुटण्याच्या भीतीने सांभाळत राहावे लागले तर जनतेची कामे कशी होणार राजकारणात पक्षांतरांचे वारे वाहत असतात परंतु गैर पद्धतीने फ़ोडा-फाडीचे राजकारण करून विकास होत नसतो. विरोधीकांचेही कर्तव्य असते की चांगल्या कामांना प्रतिसाद देऊन ते विकास काम जनहिताचे झाले पाहिजे याकडेही लक्ष दिले पाहिजे असे स्पष्ट मत त्यांनी यावेळी व्यक्त केले

कोरोना काळात महाविकास आघाडीने चांगले काम केले राज्याचे आर्थिक घडी ही कमजोर होऊ दिली नाही त्या काळात चांगल्या प्रकारे आर्थिक शिस्त लावल्या गेले याबाबतचे कौतुक त्यांनीही केले आहे त्यामुळे आर्थिक शिस्त ही गरजेची असते.मैत्री कंपनी बाबत काही ठेवीदारांनी निवेदन दिले असता त्यांनी सदर व्यक्तींनी ठेवी ठेवताना या नॅशनल बँकेत ठेवाव्यात.जास्त व्याजदराच्या मागे न पडता विश्वसनीय अशा बँकेत ठेवाव्या जेणेकरून त्यांना आर्थिक फसवणुकीला सामोरे जावे लागणार नाही परंतु थोड्याफार वाढीव व्याजदरच्या मागे लोक पडतात आणि आपली फसवणूक करून घेतात बी एच आर चे उदाहरण असेच आहे हेही ते सांगण्यास विसरले नाही

गद्दारीवर भाष्य करताना त्यांनी सांगितले की हा शाहू, फुले,आंबेडकरांचा महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे येथे गद्दारी सहन केली जात नाही जनता ही अशांना धडा शिकवण्यासाठी योग्य वेळी योग्य ते बटन दाबत असते हेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले जर आपण गद्दार नाहीत तर आपल्याला गद्दार म्हटल्यावर मिरच्या लागण्याचे काय कारण आहे असाही प्रश्न उपस्थित केला

शेतकऱ्यांच्या पशुधनावर आजच्या लंपी आजाराने विळखा घातला आहे त्यावर सरकारने लवकर उपाययोजना करायला हवी महाराष्ट्रातल्या लसीकरण निर्मिती असलेल्या ठिकाणाहून इतर राज्यात केंद्राच्या म्हणण्यावर लसी न देता आधी आपल्या राज्यातील पशुधनाचा वेळीच लसीकरणामार्फत उपचार करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा जेणेकरून त्यांचा दुग्ध व्यवसाय हा सुरळीत सुरू राहील असेही त्यांनी आपल्या भाषणात यावेळी टीकास्त्र डागत निशाणा साधला

जनतेमधून डायरेक्ट सरपंच, नगराध्यक्ष याबाबत जी निवड होणारा आहे त्याविषयी त्यांनी शिंदे सरकारवर टीका करत मुख्यमंत्रीही डायरेक्ट जनतेतून निवडा असे आव्हान केले स्वतःला जे सोयीचे आहे ते करायचे हे वृत्ती आता बंद केली पाहिजे अशी कोपरखळी त्यांनी मारली

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडी चांगले कार्य करीत होती हेच विरोधकांना बघितले गेले नाही त्यामुळेच त्यांनी हे फोडाफाडीचे राजकारण करून सत्तांतर घडवून आणले जळगाव आणि औरंगाबाद जिल्ह्यातील सर्वात जास्त आमदार हे फुटून बाहेर पडले आणि आजचे चित्र दिसत आहे. परंतु सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचे कट्टर समर्थक असलेले व या जिल्ह्यातील लोक नक्कीच या फुटिरांना धडा शिकवतील आणि येणाऱ्या निवडणुकीत त्यांचा पराभव करतील कारण शिवसेनेतून निघणारे नारायण राणे असो किंवा छगन भुजबळ हे निवडून आलेले नव्हते अशी आठवण त्यांनी यावेळी उपस्थित जनसमुदायाला करून दिली.

येथील शिवसेना आमदाराला बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे बघून निवडून दिले होते परंतु आता पुढील इलेक्शनला येथे जनता काय करते हे मला आता स्पष्ट सांगण्याची गरज नाही. पुढील येणारे सर्व इलेक्शन्स मध्ये पक्षातील व महाविकास आघाडीतील सर्व उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन करीत त्यांनी आपल्या भाषणाचा समारोप केला.

यावेळी मा.आ दिलीप वाघ यानी प्रास्ताविकात प्रास्ताविकात दोन ऑक्टोबरपासून तालुक्यातील प्रत्येक गावात जनसंवाद यात्रा काढली जाणार असल्याचे व आपले मते मांडली, मा.आ.डॉ सतीश पाटील ,आ.एकनाथ खडसे, मा.वि.स.स. अरुण गुजराथी आदींची मनोगते झाली सदर कार्यक्रमासाठी व्यासपीठावर माजी खासदार वसंतराव,मोरे, मा आ राजीव देशमुख,माजी मंत्री गुलाबराव देवकर,अमळनेरचे आ.अनिल पाटील,राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील,विलास पाटील, पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे चेअरमन संजय वाघ,व्ही.टी.जोशी,भूषण वाघ, सुचेता वाघ,ज्योती वाघ ,वंदनाताई पाटील जिल्हा बँकेचे संचालक प्रदीप,देशमुख, जिल्हा दूध संघाचे संचालक,प्रमोद पाटील, जिल्हा परिषदेचे माजी, सदस्य शशिकांत साळुंखे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष व बाजार समितीचे प्रशासक दिनेश पाटील, भगवान पाटील, अतुल देशमुख, चाळीसगाव विकासोचे अरमन प्रदीप देवराव देशमुख, व्हाइस चेअरमन प्रवीण राजपूत, मिलिंद देशमुख ,शामकांत भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.

बातमी लाईक  करा,शेअर करा

खालील YouTube लिंक वर क्लिक करून  Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा  

https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber

Z4 NEWS
मुख्य संपादक- उमेश राऊत
मो : 8411009377

COMPLETE SOLUTION FOR YOUR NEED

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: CALL ME 8411009377 \\\\