साई इंग्लिश अकॅडमि, अमळनेरतर्फे-जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला.

अमळनेर,दि 5- साई इंग्लिश अकॅडमिकोचिंग क्लासेस तर्फे-आज 5 जून रोजी,जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला.कार्यक्रम प्रमुख अतिथी म्हणून बळवंत विठ्ठल पाटील-वनपरिक्षेत्र अधिकारी सामाजिक वनीकरण,अमळनेर तसेच आय.टी.चव्हाण-वनपाल सामाजिक वनीकरण,अमळनेर तसेच सौ.प्रतिभा मगरसरकारी अभियोक्ता,पारोळा कोर्ट हे होते.प्रमुख अतिथी बळवंत पाटील यांनीआपल्या भाषणात म्हटले -पर्यावरणाच्या अनेक समस्या सध्याजगभरात जाणवत आहेत.त्यासंदर्भातजनमानसांत जागरूकता निर्माण व्हावी,यासाठी दरवर्षी 5 जून रोजी जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जातो.कोरोना काळात ओक्सिजनचे महत्वआपल्याला समजले,झाडे हेच ओक्सिजनप्राणवायूचे प्रमुख स्त्रोत आहेत…म्हणूनचजास्तीत जास्त झाडे आपण लावलीपाहिजेत,ती जगवली पाहिजे.ह्या प्रसंगी साई इंग्लिश अकॅडमिच्या विद्यार्थ्यांना रोपे वाटण्यात आली.विद्यार्थ्यांनी सुद्धा आपल्या मनोगतात सांगितले-आम्हाला मिळालेलीरोपे आम्ही आजच आमच्या घराच्याबागेत,परिसरात,शेतात व इतरत्र लावू.रोपाची काळजी घेऊन,संगोपन करून रोपांचा वाढदिवस साजरा करू.कार्यक्रम प्रास्ताविक व सूत्रसंचालनसाई इंग्लिश अकॅडमि संचालक-भैय्यासाहेब मगर यांनी केले.

बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
Z4 NEWS
मुख्य संपादक- उमेश राऊत
मो : 8411009377



