शिक्षणाचे निलेश पर्व या उपक्रमाच्या माध्यमातून शालेय साहित्यांचे वाटप.
जामनेर:- शिक्षणाचे निलेश पर्व हा उपक्रम मुंबईस्थित निलेश राणे युवा प्रतिष्ठानच्या वतीने राबविण्यात येत असून या उपक्रमाची सुरवात दि. १० ऑगस्ट २०२४ रोजी जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी जवळील बिलवाडी गावातील जिल्हापरिषद अंतर्गत येणाऱ्या शाळेपासून करण्यात आली, यामध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थी हे शिक्षणापासून वंचित राहू नये, तसेच त्यांच्यात शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी म्हणून त्यांना शालेय उपयोगी वह्या, स्कुल बॅग या साहित्यांचे वाटप डॉ.निलेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली निलेश पर्व या अनोख्या उपक्रमातून करण्यात आले,
त्याप्रसंगी निलेश राणे प्रतिष्ठानचे जळगांव शिक्षक सेलचे जिल्हाध्यक्ष श्री.समाधान मुळे, युवक जिल्हाध्यक्ष कु.प्रदीप पाटील, कु.अतुल पाटील, कु. जयेश पाटील, श्री.विशाल पाटील, कु.अक्षय पाटील भागवत पाटील, भावेश पाटील, अतुल पाटील, दिगंबर पाटील, जयेश पाटील, समीर तडवी, मनोज पाटील राहुल रॉय मुले व पदाधिकारी उपस्थित होते.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377