निपाणे स्मशानभुमी वादाने पाचोऱ्यात तेढ वाढले ?

पाचोरा दि २४- तालुक्यातील निपाणे येथील दलीत महिलेचा अंत्यविधी संदर्भातील वाद उग्र स्वरुप धारण करीत असून अनेक सामाजिक व राजकीय संघटना या बाबत विविध स्तरावर निवेदने देणे ,आंदोलन करीत आहे. यामुळे दोन समाजात सामाजिक सलोखा न राहता विषमता पसरवण्याचे काम होत आहे.
या प्रकरणातील आरोपिंच्या विरुद्ध विविध सामाजिक संघटना तसेच अनेक राजकीय लोक आंदोलन करीत असल्याने तालुक्यातील व निपाने या गावी दोन समाजामध्ये तेढ निर्माण झालेले आहे याबाबत दावे-प्रतिदावे केले जात असले तरी त्या बाबतचे कायदेशीर कामकाज सुरू आहे. मृत महिलेच्या परिवाराने संबंधित लोकांविरुद्ध ऍट्रासिटी नुसार गुन्हा नोंदवला आहे. याचा तपास डीवायएसपी काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे परंतु असे असताना सदर तपास पूर्ण होईपर्यंत दोन्ही समाजातील लोकांनी विचार विनिमय करून शांततेने हा प्रश्न सोडविणे असे असताना याला राजकीय वळण देऊन काही लोक वाद पेटवीत आहे
अशा गोष्टी सुरू असल्याने दोन समाजात तेढ निर्माण होताना दिसत आहे. तरी जोपर्यंत तपास पूर्ण होत नाही व न्यायालयामार्फत न्यायदानाचे काम पूर्ण होत नाही तोपर्यंत राजकीय तसेच सामाजिक व्यक्तींनी सामाजिक शांतता राखण्याचे प्रयत्न होतील याबाबत काळजी घेणे गरजेचे आहे. शिवाय राजकीय आखाड्यात काय डावपेच होतीलच ते होतील ते क्षेत्र वेगळे आहे.पण या घटने संदर्भात पोलिस आपले काम चोख बजावीत आहे तरी त्यांना ते करू देणे अपेक्षित आहे. जे तपासांती निष्कर्ष बाहेर येतील त्या अनुषंगाने जे न्याय बाजू असेल ती ग्राह्य धरून कायदा आपले काम करेलच परंतु आज शांतता राखण्याचे आवाहन आ.किशोर पाटील यांनी राजकीय व सर्व सामाजिक संघटनाना पत्रकार परिषदेत केले.
गिरणा परिसरात भरपूर पाऊस पडल्याने गिरणा धरणासह संपूर्ण तालुक्यातील धरणे भरलेली आहेत पाणी टंचाईची समस्या संपल्याचे समाधान मानून अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झालेले दिसते मका,निंबू,कपाशी,आदी पिकांवर परिणाम झालेला दिसत आहे ओला दुष्काळ जाहीर करावा या बाबतचे मागणी शिंदे सरकारकडे करणार असल्याचे आमदार पाटील यांनी बोलून दाखवले व प्रांताधिकारी यांना पंचनामा करून नुकसानी बाबत अहवाल तयार करण्याच्याही सूचना दिले असल्याचे ते म्हटले.
यानंतर प्रसिद्ध उद्योजक मुकुंद बिल्दीकर यांनी पाचोरा येथे भरविण्यात आलेल्या दांडिया स्पर्धा जल्लोष २०२२ च्या कार्यक्रमाची रूपरेषा सांगत मराठी तारका प्रार्थना बेहरे व गायिका वैशाली माडे ८ व ९ ऑक्टोबर रोजी येणार असल्याचे सांगितले तर आमदार पुत्र सुमित पाटील यांनी सदर दांडिया स्पर्धेसाठी आपण आमंत्रित असल्याचे जनतेला आवाहन केले.पत्रकार संदीप महाजन यांनीही या सांस्कृतिक कार्यक्रमास पत्रकार बांधवांसाठी वृत्त संकलन तसेच बैठकीची व्ययस्था असल्याचे सांगून सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
Z4 NEWS
मुख्य संपादक- उमेश राऊत
मो : 8411009377



