पाचोरा दि 26 – येथे आंबेडकरी जनतेने तालुक्यातील निपाणे येथील दलित महिलेचा अंत्यविधी सार्वजनिक स्मशाभूमीत करण्यास गावतील काहींनी विरोध केल्या संदर्भातील घडलेल्या घटनेत दोषी असलेल्या आरोपींना ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत अटक करण्यात यावी यासाठी मोर्चा काढला .छत्रपती शिवाजी महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळ्यास माल्यार्पण करून सदर मोर्चा पोलीस स्टेशन येथे दाखल झाला.
निपाणे येथील माजी जिल्हा परिषद सदस्य व इतर संशयित यांच्याविरुद्ध पोलिसात ॲट्रॉसिटी कायदा अंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे व त्याचा तपास डीवायएसपी भरत काकडे हे करत आहे. परंतु घटनेला बरेच दिवस उलटूनही सदर आरोपींना अटक होत नसल्याचे कारणास्तव आंबेडकरी जनतेमध्ये तीव्र असंतोष पसरत आहे त्यामुळे अनेक संघटना निवेदने देऊन आंदोलन करीत आहे. आजचे आंदोलन जरी छोट्या स्वरूपात असले तरी येत्या शनिवारी हे आंदोलन सबंध तालुक्यातून आंबेडकरी समाज एकवटून मोर्चा काढला जाईल असे उपस्थित बंधूनी आपल्या मनोगतातून बोलून दाखवले
किशोर डोंगरे यांनी “.मराठा समाज हा आमचा मोठा भाऊ आहे.”कारण शाहु महाराज नसते तर आम्हाला समानतेचा,शिक्षणाचा अधिकार मिळाला नसता.समाज,धर्म व जात विरोधी आमचे आंदोलन नसून मनुवादी,जातिभेदचा विचार बाळगणारी जमात व व्यक्ती विरोधी आहे.म्हणून समाजात तेढ निर्माण होण्याचा प्रश्नच उरत नाही. या घटनेचा मराठा समाजाकडून पण तीव्र निषेध नोंदविला जात आहे. दोन समाजात तेढ निर्माण होईल असे वक्तव्य करणे देखील चुकीचे आहे असे मानोगत त्यांनी व्यक्त केले.
ॲड.रोहित ब्राह्मणे यांनी सदर बाब चौकशीस असल्याने जी काही कायद्याची लढाई आहे ती कायद्यानेच करू व कायदेशीर मार्गाने आंदोलन करून आम्ही पीडित कुटुंबाला न्याय मिळवुन देऊ तसेच पोलीस अधिकाऱ्यांनीही सदर आरोपींना पाठीशी न घालता त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला पाहिजे. अन्यथा ही लढाई सुप्रीम कोर्टापर्यंत लढली जाईल असेही आपल्या बोलण्यातून गर्भित इशारा दिला. सदर आरोपी मिळून येत नसल्याने त्यांना कायदेशीर नोटीस बजावून हजर राहणे व त्याबाबत पाठपुरावा करणे ही बाब कायद्यांच्या तरतुदीत असताना पोलीस मात्र काही एक कारवाई करत नाही हे स्पष्टपणे मांडले ,आंबेडकरी जनतेला प्रस्थापित राजकीय पक्षांनी गृहीत धरू नये असेही रोख बजावले.
यावेळी यावेळी पोलीस निरीक्षक किसनराव नजन पाटील यांना निवेदन देण्यात आले सदर मोर्चा वेळी असंख्य आंबेडकरी समाज बांधव व महिला बघिणी उपस्थित होते
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
Z4 NEWS
मुख्य संपादक- उमेश राऊत
मो : 8411009377