डॉ एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाऊंडेशन च्या महाराष्ट्र राज्य समन्वयक पदी मनीषा चौधरी यांची पुन्हां नियुक्ती .

जळगाव,दि 26 – डॉ एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाऊंडेशन,हाऊस ऑफ कलाम,रामेश्वरम , तामिळनाडू या संस्थे च्या महाराष्ट्र राज्य समन्वयक पदी मनीषा चौधरी यांची पुन्हा नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ.कलाम यांचे विचार विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविण्याचे कार्य आणि त्यांचे स्वप्नातील विकसित राष्ट्र घडविण्याचे कार्य सदर संस्थे तर्फे केले जाते.
२०१६ पासून मनीषा चौधरी या संस्थेचे कार्य महाराष्ट्रात करीत असून या वर्षी त्यांना पुन्हा नियुक्त करण्यात येत आहे. १५ ऑक्टोबर ला डॉ.कलाम यांच्या जयंती निमित्त महाराष्ट्रभर शाळा आणि कॉलेज मध्ये विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास,कुशल बुद्धी , चांगले विचार आणि कला गुणांना वाव देण्यासाठी विविध उपक्रम AKIF या संस्थे तर्फे मनीषा चौधरी यांचे नेतृत्वात मोफत राबविले जाणार आहेत.
राष्ट्रीय स्तरावर चित्रकला स्पर्धा , वक्तृत्व स्पर्धा, विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे प्रत्यक्ष काम करणारे मॉडेल्स अश्या विविध स्पर्धां मध्ये जास्तीत जास्त शाळांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन मनीषा चौधरी यांचे कडून करण्यात येत आहे. राष्ट्रीय स्तरावरील या सर्व स्पर्धा मोफत असून विजयी विद्यार्थ्यांना कलाम कुटुंबियांकडून प्रशस्ती पत्रे दिले जातील .
लवकरच भारतातील पहिले व पुन्हा वापरता येणारे रॉकेट आणि विद्यार्थ्यांना स्वतः बनवता येणारे रॉकेट असा प्रकल्प आणला जाईल.सोबतच विद्यार्थ्यांनी बनविलेले १५० उपग्रह चेन्नई येथून प्रक्षेपित करण्याचा उपक्रम संस्थे तर्फे राबविला जाणार असून संपूर्ण जगात या घटनेची नोंद घेतली जाईल . सदर प्रकल्पात ५वी ते १२वी चे विद्यार्थी सहभागी होऊ शकतील . डॉ अब्दुल कलाम यांचा ९१ व्या जयंीनिमित्त समारंभ प्रसंगी व विविध स्पर्धा झाल्या नंतर रॉकेट आणि उपग्रह प्रकल्पा संबधी माहिती देण्यात येणार आहे.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS
मुख्य संपादक- उमेश राऊत
मो : 8411009377



