जळगांव – समता सैनिक दल विश्वभूषण.डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी फार मोठ्या दृष्टीने स्थापन केले आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले होते गाव तिथे शाखा उभारणार त्यानुसार प्रत्येक खेड्यात समता सैनिक दलाची शाखा व सैनिक निर्माण केले जातील. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात समता सैनिक दलाचे ट्रेनिंग सेंटर निर्माण करण्यात येऊन समता सैनिक दलाच्या मुख्य उद्देश सफल होण्यासाठी प्रशिक्षित सैनिक तयार करणार व विश्वभूषण बाबासाहेब आंबेडकरांचा RPI देशात मजबूत करणे आवश्यक आहे. हे देशाच्या संसदीय लोकशाही साठी आवश्यक आहे. बाबासाहेबांशी गद्दारी करणाऱ्यांना व संविधानाची प्रतारणा करणाऱ्या देशद्रोह्यांना समता सैनिक दल धडा शिकवणार.बहुजन समाजातील तरुण तरुणींना प्रथम भारतीय व अंततः भारतीय असल्याची शिकवण देऊन जात मानसिकता खतम करणार. बाबासाहेबांच्या निर्देशानुसार भारतात समता सैनिक दल मजबूत करणार.या भारत देशातील विषमता विरुद्ध आता समता सैनिक दलाने पुढे आवश्यक आहे. या देशातील विषमता नष्ट करणे हे समता सैनिक दलाचे कर्तव्य आहे.असे प्रतिपादन समता सैनिक दलाचे केंद्रीय प्रचारक व मुख्य वक्ते राजाभाऊ कदम यांनी 16 ऑक्टोबर 2022 रोजी समता सैनिक दल, जळगांव जिल्हा शाखेच्या वतीने जिल्हा स्तरीय कार्यकर्ता मेळावा व चर्चा सत्र मध्ये केले.
समता सैनिक दलाच्या जळगाव जिल्हा शाखेच्या वतीने मेळावा व चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आले होते.या वेळी अध्यक्षस्थानी समता सैनिक दलाचे केंद्रीय प्रचारक मा.धर्मभूषण बागुल हे होते.धर्मभूषण बागुल यांनी अध्यक्षीय भाषणा द्वारे सांगितले की, डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे सामाजिक विचार बरोबर राजकीय विचार देखील आम्ही सोबत घेऊन डॉ बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित राजकिय व सामाजिक क्रांती घडवून आणली जाऊ शकते. या साठी समता सैनिक दलाच्या सैनिक यांचे योगदान आज रोजी फार महत्वाचे आहे. निव्वळ सामाजिक कार्य करून काहीच साध्य होणार नाही. त्या डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी स्पष्ट सांगितले की, आपल्या राजकीय पक्षाची आघाडीची फौज म्हणजे समता सैनिक दल आहे. याच संदेश प्रत्येक समुहाला सांगणे आपले कर्तव्य आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक समता सैनिक दल जळगांव जिल्हा प्रचारक समितीचे प्रमुख विजय निकम यांनी केले. प्रास्ताविक करीत असताना विजय निकम यांनी या मेळावा डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या समता सैनिक दलाचे ध्येय….उद्देश कार्यक्रम जळगांव जिल्हात समता सैनिक दलाचा मेळावा संपन्न होत आहे. असे सांगितले. तर समता सैनिक दलाचे जिल्हा प्रचारक किशोर डोंगरे यांनी केद्रीय प्रचारक नानासाहेब धर्मभुषण बागुल साहेब,व केंद्रीय प्रचारक राजूभाऊ कदम,व जिल्हा प्रचारक विजय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली लवकरच गाव येथे शाखा घर तेथे सैनिक जिल्हा भर निर्माण करण्याचे ध्येय गाठणार
समता सैनिक दलात सौ.रत्न ताई बागुल , युवराज सुरवाडे, सुधीर संदनशीव , अकोल्याचे मार्शल इंगळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी , गोपीचंद भालेराव ,आदींनी प्रवेश केला. कार्यक्रमात शेकडो नागरिक व पदाधिकारी सहभागी झाले होते.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सुधीर संदनशीव ,भाईदास पाटील, अरुण पाटील, जयेश भालेराव, संजय सपकाळे, अनिल सोनवणे यांनी परिश्रम घेतले सूत्रसंचालन जिल्हा प्रचारक स्वप्निल जाधव यांनी केले मेळवा,चर्चा सत्राची व पुढील वाटचालीची पुर्ण माहिती किशोर डोंगरे यांनी पाचोरा येथील पत्रकार बंधूना दिली..
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS
मुख्य संपादक- उमेश राऊत
मो : 8411009377