आपल्याला अशा प्रकारे जाहिरात करणे साठी संपर्क करा
महाराष्ट्र

पाचोरा रेल्वे प्रवासी कृती समिती तर्फे धरणे आंदोलन

पाचोरा,दि २०- येथील रेल्वे स्टेशनवर  पंजाब मेल ,विदर्भ एक्सप्रेस, च्या थांब्यासह भुसावळ-मुबई पॅसेजर सुरु करण्या बाबत कोरोना महामारीच्या काळानंतर सुरू झालेल्या रेल्वेचे वेळापत्रक फार मोठ्या प्रमाणात बदलले आहे.त्याच्या परिणामी पाचोरा रेल्वे स्टेशनचे वेळापत्रक विस्कळीत झाले आहे त्यामुळे सायंकाळी सहा वाजेनंतर पाचोरा हून मुंबईत जाण्यासाठी कोणतीही रेल्वे उपलब्ध नाही.त्यासाठी विदर्भ एक्सप्रेस .पंजाब मेल. या दोन गाड्या पाचोरा येथे थांबा मिळावा अशी या धरणे आंदोलनाच्या माध्यमातून मागणी केली जात आहे

तसेच ग्रामीण  भागातील जनतेच्या दृष्टीने अतिशय सोयीची असलेली भुसावळ मुंबई पॅसेंजर जी आर्थिक दृष्ट्या गोरगरीब व सामान्यांना परवडणारी पॅसेंजर त्वरित सुरू करावी व लोक भावनांचा आदर करावा.त्याच प्रमाणे देशातील प्रमुख शैक्षणिक केंद्र असलेल्या कोटा राजस्थान व पुणे महाराष्ट्र या ठिकाणी शिक्षणाच्या दृष्टीने आयटी हब म्हटले जाणारे बंगलोर या ठिकाणी पाचोरा परिसरातील अनेक तरुण नोकरी व्यवसायासाठी जातात त्यामुळे राजस्थान,गुजरात,महाराष्ट्र व कर्नाटक या राज्यांना जोडणाऱ्या गाडी नंबर 12627 कर्नाटक एक्सप्रेस, गाडी नं  09740 साईनगर जयपुर कोटा एक्सप्रेस, गाडी नं 16501अहमदाबाद बेंगलोर एक्सप्रेस

गाडी नं.16734 ओखा रामेश्वर एक्सप्रेस या गाड्यांना पाचोरा येथे थांबा देऊन जनतेला दिलासा मिळावा यासाठी आजचे धरणे आंदोलन करण्यात आले

आंदोलना मध्ये पाचोरा रेल्वे प्रवासी कृती समितीचे कार्याध्यक्ष अँड अविनाश भालेराव,संयोजक नानासाहेब वि टी जोशी,सरचिटणीस सुनील शिंदे,खजिनदार पप्पू राजपूत,उपाध्यक्ष भरत खंडेलवाल, नंदकुमार विकास ,वाहक सोनार, गणेश पाटील, संजय जडे,विधी सल्लागार अॅड अण्णा भोईटे,आनिलआबा येवले, बागवान, किशोर डोंगरे, अशोक मोरे, बंडू मोरे,आदी पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

या आंदोलनाला व्यापारी असोसिएशन, शैक्षणिक संस्था ,डॉक्टर असोसिएशन,सराफ असोसिएशन रिक्षा युनियन,राजकीय संघटना सामाजिक संघटनांनी धरणे आंदोलन करते वेळी येऊन पाठिंबा दर्शवला.

बातमी लाईक  करा,शेअर करा

खालील YouTube लिंक वर क्लिक करून  Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा  

https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber


बातमी व जाहिराती साठी संपर्क
Z4 NEWS
मुख्य संपादक- उमेश राऊत
मो : 8411009377

COMPLETE SOLUTION FOR YOUR NEED

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!