पाचोरा तालुक्यातील खडक देवळा बू येथील स्वामी कृषी केंद्रात बनावट खत विक्री मुळे गुन्हा दाखल

पाचोरा तालुक्यातील खडक देवळा बू येथील स्वामी कृषी केंद्र येथे इंडियन पोटॅश लिमिटेड(IPL) कंपनीचे बनावट म्युरेट ऑफ पोटॅश हे रासायनिक खत असल्याचे तपासणीमध्ये श्री अरुण तायडे, जिल्हागुण नियंत्रण निरीक्षक, जळगाव यांना आढळून आलेत सदर रासायनिक खतास विक्री बंद आदेश देऊन त्याचा तपासणी करणे कामी नमुना रासायनिक खत तपासणी प्रयोगशाळेत पाठवला तसेच इंडियन लिमिटेड या कंपनीचे जिल्हा प्रतिनिधी श्री शिवाजी ठवरे यांनी सदर बनावट खताच्या बॅग चे फोटो घेऊन इंडियन पोटॅश लिमिटेड या कंपनी मुख्यालयात पाठवले.
दिनांक 31/ 10/ 2022 रोजी प्रयोगशाळेतून सदर रासायनिक खत तपासणी अहवालामध्ये अपेक्षित पोटॅश प्रमाण 60 % ऐवजी फक्त 15.43% असल्याचे आढळून आले व सदर नमुना अपात्र झाला. तसेच इंडियन पोटॅश कंपनीने सदर रासायनिक खत व त्यावरील बॅच नंबर, लॉट नंबर इत्यादी तपासणी करून सांगितले की हे आमच्या कंपनीचे उत्पादन नसून ते कोणीतरी बनावट विक्री करत असल्याचे सांगितले. मा. श्री मोहन वाघ, विभागीय कृषी सहसंचालक नाशिक विभाग यांच्या व श्री संभाजी ठाकूर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जळगाव यांच्या आदेशान्वये व श्री अनिल भोकरे कृषी उपसंचालक जळगाव व श्री वैभव शिंदे कृषी विकास अधिकारी जिल्हा परिषद जळगाव यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 01/11/2022 रोजी जिल्हास्तरीय पथक व तालुकास्तरीय पथक मधील सदस्य श्री अरुण तायडे, जिल्हा गुण नियंत्रण निरीक्षक ,श्री विजय पवार मोहिम अधिकारी जिल्हा परिषद जळगाव ,श्री मारुती भालेराव कृषी अधिकारी पंचायत समिती पाचोरा व श्री अशोक जाधव, मंडळ कृषी अधिकारी, पाचोरा यांनी श्री स्वामी कृषी सेवा केंद्र खडक देवळा बुद्रुक या ठिकाणी जाऊन मुरेट ऑफ पोटॅश हे खत जप्त केले व त्याचे संचालक श्री सुनील प्रभाकर सिनकर यांच्याविरुद्ध पोलीस स्टेशन पाचोरा येथे शेतकऱ्यांची व शासनाचे फसवणूक केले बाबत फिर्याद दाखल केली आहेत.
पुढील तपास श्री योगेश गणगे, पोलिस उपनिरीक्षक, पाचोरा पोलिस स्टेशन हे करत आहे.
मा. श्री. मोहन वाघ, विभागीय कृषी सहसंचालक नाशिक, यांनी शेतकऱ्यांना आवाहन केले आहे की बियाणे,खते व कीटकनाशक ही अधिकृत विक्रेत्याकडूनच बिलामध्ये/ई पॉस मशीन द्वारे खरेदी करावे आणि अशा प्रकारचे बनावट रासायनिक खते व इतर कृषी निविष्ठा विक्री होत असल्याचे आढळून आल्यास कृषी विभागाकडे संपर्क करावा अशा विक्री करणाऱ्या विरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल असे सांगितले.
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377
बातमी लाईक करा,शेअर करा



