पाचोऱ्यात मा.फुलेंचे स्मारक उभारणीच्या नियोजीत जागेवर भुमी पुजन संपन्न

पाचोरा – दि १ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता क्रांती सुर्य महात्मा जोतीराव फुलेंचे स्मारक उभारणीच्या नियोजीत जागेवर भुमी पुजन सोहळा आ. किशोर आप्पासाहेबांच्या हस्ते संपन्न झाला त्या ठिकाणी सर्वं बहुजन समाज व माळी समाज बांधव सामाजिक संघटनांचे पदाधिकारी अधिकारी उपस्थित होते शाहीर विठ्ठल एकनाथ महाजन माऊली यांनी १८/८/२० १५ रोजी पुतळ्याची मागणी करण्यासाठी हुतात्मा स्मारक येथे बहुजन समाज व माळी समाज सामाजिक संघटनांचे अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव सदस्य अठरा पगड जातीचे अलुतेदार बुलेतेदार बहुजन समाजचे माळी समाजाचे समाज बांधवांना पुतळा उभारणी करण्या करीता विठ्ठल एकनाथ महाजन माऊली यांनी पहीली मीटिंग आयोजित करून मार्गदर्शन केले त्या दिवसापासून पाठपुरावा करायला सुरुवात केली होती. आज त्याचे फळ सर्वं बहुजन समाजाला व माळी समाजाला तसेच सामाजिक संघटनांना भेटले आहे. म्हणून आप्पासाहेब किशोर धनसिंग पाटील आमदार पाचोरा भडगाव यांचे सर्व समाजा कडुन कौतुक होत आहे. शाहीर विठ्ठल एकनाथ महाजन माऊली व समाज बांधवांनी आमदार साहेबांचे जाहीर आभार मानले.
बातमी लाईक करा शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क
Z4 NEWS,
मुख्य संपादक- उमेश राऊत
मो : 8411009377



