पाचोरा येथे दि. १२ नोव्हेंबर रोजी संपन्न झालेल्या राष्ट्रीय लोक न्यायालयात ५०६ प्रकरणांचा निपटारा
१ कोटी ७ लाख १२ हजार ८०४ रुपयांची वसुली
पाचोरा, दि.13 – महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरण, मुंबई तथा उच्च न्यायालय, मुंबई, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जळगांव यांचे आदेशाने पाचोरा तालुका विधी सेवा समिती, व पाचोरा वकिल संघ पाचोरा यांचे संयुक्त विदयमाने “राष्ट्रीय लोक न्यायालय” दि. १२ नोव्हेंबर २०२२रोजी पाचोरा न्यायालयात संपन्न झाले. सदरहू राष्ट्रीय लोक न्यायालयात दिवाणी व फौजदारी प्रकरणे तसेच वादपूर्व ५०६ प्रकरणांचा निपटारा होवून १ कोटी ७ लाख १२ हजार ८०४ रूपयांचा वसुली झाली आहे. या लोक न्यायालयात पॅनल क्रं. १ वर तालुका विधी सेवा समिती, पाचोराचे अध्यक्ष तथा न्यायीक अधिकारी दिवाणी न्यायाधीश जी. बी. औंधकर, तसेच पंच सदस्य अॅड. भाग्यश्री महाजन यांनी काम पाहिले तसेच पॅनल क. २ वर सह दिवाणी न्यायाधीश श्रीमती एम. जी. हिवराळे तसेच २ रे सह न्यायाधीश एल. व्ही. श्रीखंडे आणि पंच सदस्य अॅड. भिकुबाई पाटील यांनी काम पाहिले. यावेळी वकील संघाचे अध्यक्ष अॅड. प्रविण पाटील, उपाध्यक्ष अॅड. चंदन राजपुत, सचिव अॅड. राजेंद्र पाटील, तसेच पंच सदस्य व जेष्ठ विधीज्ञ मंडळी उपस्थित होते. याप्रसंगी तालुका विधी सेवा समिती, पाचोराचे अध्यक्ष जी. बी. औंधकर यांनी आवाहन केले की, यापुढे होणा-या लोक न्यायालयात जास्तीत जास्त प्रकरणे ठेवून सहभाग नोंदवावा व लोक न्यायालय यशस्वी करून लाभ घ्यावा. लोक न्यायालय यशस्वीतेसाठी पाचोरा वकील संघ अध्यक्ष व सभासद, विधीज्ञ मंडळी तसेच पंचायत समिती, पाचोराचे अधिकारी वर्ग, तालुक्यातील सर्व ग्रामसेवक वृंद, बॅक कर्मचारी, दूरसंचार कर्मचारी तसेच सहाय्यक अधिक्षक, जी. आर. पवार, तालुका विधी सेवा समितीचे सहायक दिपक तायडे, न्यायालयीन कर्मचारी ईश्वर पाटील, स्वप्नील पाटील, रविंद्र पाटील, सचिन राजपुत, पोलीस कर्मचारी प्रदीप पाटील, दिपक (आबा) पाटील, विकास सुर्यवंशी, राजेंद्र पाटील व न्यायालयातील सर्व कर्मचारी वृंद आणि पाचोरा पोलीस स्टेशनचे कर्मचारी वृंद यांनी परिश्रम घेतले.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377