‘महा आवास अभियान 2020-21’ मध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या नाशिक विभागाला 23 पुरस्कार प्राप्त
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्याच्या हस्ते ‘अमृत महाआवास अभियानाच्या शुभारंभ प्रसंगी पुरस्कार देवून केला गौरव
नाशिक, दि.25 – सन 2024 पर्यंत ‘सर्वांसाठी घरे’ हे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे उद्दिष्ट असून आता ‘अमृत महाआवास योजना’ 2022 – 23 अभियानातील 5 लाख घरे पुढील 100 दिवसात बांधण्यात येणार आहेत. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित ‘अमृत महाआवास अभियान 2022-23’ चा राज्यस्तरीय शुभारंभ मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर मध्ये करण्यात आला. ‘महा आवास अभियान 2020-21’ मध्ये मूलभूत नागरी सुविधा पुरवून भूमीहीन लाभार्थ्यांचे घरकुलाचे स्वप्न पूर्ण करुन आदर्श घरांची निर्मिती करणाऱ्या नाशिक विभागाला 23 पुरस्कारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणचा सर्वोत्कृष्ट विभाग तृतीय क्रमांकाचा पुरस्कार नाशिक विभागाला मिळाला असून विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी स्वीकारला तसेच राज्य पुरस्कृत आवास योजनेत द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार नाशिक विभागाला प्राप्त झाला आहे.
नाशिक जिल्ह्याला पाच पुरस्कार
नाशिक जिल्ह्याला पाच पुरस्कार प्राप्त झाले असून देवळा तालुक्यातील कणकापूर ग्रामपंचायतील सर्वोत्कृष्ट गृहसंकुलाची निर्मिती यामध्ये तृतीय क्रमांकाचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. राज्य पुरस्कृत आवास योजना मधील संख्यात्मक प्रगतीनुसार सर्वोत्तम जिल्ह्यात नाशिक जिल्हाधिकारी यांना तृतीय क्रमाकांचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. नाशिक जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी व प्रकल्प संचालक यांना इतर विषेश उपक्रम राबविल्याने प्रथम क्रमांकाच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. नाशिक जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी व प्रकल्प संचालक व प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यांना शबरी आवास योजना द्वितीय पुरस्काराने गौरव करण्यात आला असून चांदवड येथील जितेंद्र शिंदे डेटा एंट्री ऑपरेटर यांना विशेष पुरस्काराने गौरविण्यात आले.
अहमदनगर जिल्ह्याला सर्वाधिक पुरस्कार प्राप्त
अहमदनगर जिल्ह्याला दहा पुरस्कार प्राप्त झाले असून राज्य पुरस्कृत आवास योजना यात सर्वोत्कृष्ट जिल्ह्यामध्ये अहमदनगर जिल्ह्याला प्रथम क्रमांकाने गौरविण्यात आले. अकोले तालुक्यातील सभापती व गटविकास अधिकारी यांना प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत सर्वोत्कृष्ट तालुका म्हणून तृतीय क्रमांकाच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. सर्वोत्कृष्ट बहुमजली इमारत यामध्ये दुसऱ्या क्रमांकाचे दर्डे कोऱ्हाळे, ता. कोपरगाव यांना प्राप्त झाला. सर्वोत्कृष्ट गृहसंकुल प्रथम क्रमांकाचे पुरस्कार अहमदनगर तालुक्यातील खरेखार्दुणे ग्रामपंचायतीला मिळाले आहे. भूमीहीन लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करुन देण्याबाबत अहमदनगर जिल्हाधिकारी यांना तृतीय क्रमाकांचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. सर्वोत्कृष्ट गृहसंकुल म्हणून राहाता तालुकयातील लोणी ग्रामपंचायतीला प्रथम क्रमांक प्राप्त झाला आहे. राज्य पुरस्कार आवास योजना सर्वोत्कृष्ट जिल्हा म्हणून प्रथम क्रमांकाचा पुरस्कार अहमदनगर जिल्ह्याला प्राप्त. राज्यस्तरीय अंमलबजावणी, संनियंत्रण व मूल्यमापनात दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार जिल्हा परिषद अहमदनगर यांना प्राप्त झाला आहे. ग्रामीण गृहनिर्माण अभियंता म्हणून संगमनेर तालुक्यातील मछिंद्र सानप यांना विशेष पुरस्काराने गौरविण्यात आले. अहमदनगर जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी व प्रकल्प संचालक व सहायक आयुक्त समाज कल्याण यांचा रमाई आवास योजना पुरस्काराने गौरव करण्यात आला
धुळे :-
धुळे जिल्ह्याला एकूण तीन पुरस्कार प्राप्त झाले असून धुळे जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी व प्रकल्प संचालक व प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यांना शबरी आवास योजना पुरस्कारात प्रथम क्रमांकाने गौरव करण्यात आला आहे. तसेच जिल्ह्याला प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत सर्वोत्कृष्ट जिल्हा म्हणून द्वितीय क्रमांकाच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. ग्रामीण गृहनिर्माण मधील कर्मचारी अमोल माळी यांना विशेष पुरस्काराने गौरविण्यात आले.
जळगाव:-
राज्य पुरस्कृत आवास योजनेअंतर्गत मुक्ताईनगर तालुक्याला सर्वोत्कृष्ट तालुका म्हणून द्वितीय क्रमांकाने गौरविण्यात आले. तर लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करुन देण्याबाबत जळगाव जिल्ह्याला प्रथम क्रमाकांचा पुरस्कार प्राप्त झाला आहे.
नंदूरबार जिल्ह्याने घरकूले 100 टक्के भौतिकदृष्ट्या पूर्ण केले असून द्वितीय क्रमांकाने जिल्ह्याला गौरविण्यात आले आहे.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377