पाचोरा,दि 24 – तालुक्यातील पिंपळगाव (हरे) येथे गावठी हातभट्टीची दारू तयार करीत असताना स्थानिक पोलिसांनी छापा टाकून सदर माल नष्ट केला होता तसेच संबधीत आरोपींवर नामे खंडू सदाशिव माळी, संजय दगा शिंदे यांचेवर पिंपळगाव (हरे) पोलीस स्टेशन मध्ये गु,र,न,55/2021, गु,र,न,,224/2021 कलम,प्रोव्ही,,65(ई)प्रमाणे , Scc no,, 739/2021, Scc no,1010/2021 नुसार पो,शि,1839/उज्वल अशोक जाधव यांचे फिर्यादी प्रमाण गुन्हायची नोंद होऊन पाचोरा न्यायालयात खटला सुरु होता. तपासी अंमलदार,पो.हे. कॉ,591निवृत्ती दशरथ मोरे व पो ना1833 शैलेश सुधाकर चव्हाण यांनी उत्तम कामगिरी करत कामकाज पाहिले तर सदर केस साठी पैरवी म्हणून Asi 491 प्रदिप मुरलीधर पाटील यांनी तर केस वॉच 1234/ राजेंद्र धर्मराज पाटील यांनी काम पाहिले
सदर गुन्ह्यात पोलिसांनी केलेल्या तपासान्वये दिनांक 24/11/2022रोजी पाचोरा प्रथम वर्ग सह.दिवाणी न्यायालय श्रीमती एम जी हिवराळे मॅडम यांच्या न्यायालयाने आरोपीस crpc 252(2)प्रमाणे दोषी ठरवले असून 3 महिने सश्रम कारावास व 3000/रु दंड शिक्षा सुनावली आहे.सरकार पक्षा तर्फे विशेषसहा.सरकारी अभियोक्ता श्री अनिल गोबा पाटील यांनी काम पाहिले. सदर निर्णयाने स्थानिक पोलीस दलात आनंद व्यक्त केला जात असून अशा प्रकारच्या गुन्ह्यात आरोपींना शिक्षा मिळाल्याचे प्रमाण अत्यल्प असल्याने याकडे एक ऐतिहासीक निर्णय म्हणून पहिले जात आहे तसेच सर्व कर्मचारी वृंदाचे वरिष्ठांकडून अभिनंदन केले जात असल्याचे समजते.
.

.
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377
बातमी लाईक करा,शेअर करा



