पाचोरा- येथे जळगाव जिल्हा प्राथ. शिक्षणाधिकारी विकासतात्या पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था आयोजीत संपुर्ण जळगाव जिंल्ह्यात केंद्रस्तरीय शिक्षण परिषद ( गटसंमेलन ) आयोजित करण्यात येत असुन पाचोरा गटाशिक्षणाधिकारी एन एफ चौधरी ,गट विस्तार अधिकारी समाधान पाटील यांच्या मागदर्शनाखाली केंद्र प्रमुख अभिजित खैरनार यांनी दि.30 नोव्हे. रोजी पाचोरा येथील श्री गो से हायस्कूल मध्ये भातखेंडे केंद्राचे शिक्षण परिषद ( गट संमेलन ) संपन्न केले. दुपारी 12-30 ते 4-30 या वेळेत वर्ग १ ते 5 विद्यार्थ्यां संदर्भात NAS परिक्षा, शालेय पोषण आहार, आधार कार्ड, संच मान्यता, ऑडीट, सर्वेक्षण, विपष्यना, आनापान सत्र अशा विविध विषयांवर आधारित मागदर्शन, उपक्रम, चर्चा सत्र संपन्न झाले यात केंद्राअंतर्गत 30 शाळांनी सहभाग घेतला होता.या शिक्षण परिषदेचे आयोजन जि.प.मांडकी,पाचोरा मिठाबाई कन्या हायस्कुल यांनी केले होते याचे औचित्य साधून नुकताच शिक्षण परिषदेचा पुरस्कार प्राप्त शिवाजी शिंदे & गुणवंत पवार व सेवा निवृत्ती बद्ल जि.प.चे केंद्र प्रमुख कैलास आमले यांचा सत्कार करण्यात आले प्रथम अशा प्रकारे सुविधा उपलब्ध करून दिल्या बद्दल श्री.गो.से. हायस्कूलच्या मुख्याध्यापिका सौ. प्रमिला वाघ, उप-मुख्याध्यापक एन आर ठाकरे यांच्यासह सर्व श्री. गो.से. हायस्कूल परिवाराचे विशेष आभार मानले
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377