पाचोरा,दि1 – तालुक्नयातील गरदेवळा येथील श्री गुरुदत्त ग्रामीण बिगरशेती सह पतसंस्था या पतपेढी चा नुतून वास्तू प्रवेश सोहळा आज पाचोरा तालुक्याचे लोकप्रिय आमदार किशोर आप्पा पाटील व जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील, चेअरमन अविनाश कुडे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडला.
चांगल काम करणारी माणसे व विचारवंत एकत्र आले की सहकार चळवळीला उंचीवर नेता येते. बहुतांश शेत्रामध्ये कमी अधिक चुकीची माणसे असतात. त्यास सहकारी पतसंस्था अपवाद नाहीत, असे असले तरी चांगले काम करणाऱ्या संस्था चालकांचे कौतुक करणे आपले कर्तव्य आहे. त्यातून चालकांना उभारी मिळून आणखी प्रगती होण्यास हातभार लागतो व ग्रामीण भागात विकास होण्यास मदत होते. नगरदेवळा सारख्या गावात विचारांची संस्कृती असल्याने येथे संस्था अधिक घौडदौड करेल. तसेच ठेवीच्या सुरक्षेला अधिक महत्त्व देणे गरजेचे असल्याचे आमदार किशोर आप्पा पाटील यांनी नविन वस्तू प्रवेश सोहळा उद्घाटन प्रसंगी केले.
चेअरमन अविनाश कुडे यांनी सांगितले की ग्रामीण भागातील जनतेला बचतीची सवय लागावी व तळागाळातील लहान व्यावसायिकांना व मोलमजुरी करणाऱ्याना उद्योग करण्यात हातभार लागावा हेच संस्थेच वैशिष्ट आहे. संस्थेचा कारभार आदर्श आहेच, ही संस्था चांगलीं सुविधा देते उत्तम सेवा देते, संस्थेची आर्थिक स्थितीची चांगलीं आहे याचे सर्व श्रेय व्यवस्थापक सह कर्मचाऱ्यांना जाते. त्यावेळी ठेवीदार व कर्जदार यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास शिवनारायण जाधव, वसंत वाणी, काशिनाथ शिरुडे, गोविंदा बोरसे, प्रकाश शिरूडे, संजय शिरुडे, अशोक शिरूडे, दत्तू भोई, विजय अहिरे सर, विमल शिरुडे भास्कर पाटील, मनोज शिरुडे, मोरेश्वर शिरुडे, जयवंत पवार, सुनिल शिंपी, सागर पाटील, धनराज चौधरी, सोनू परदेशी, गणेश देशमुख, विनोद परदेशी, निलेश शिरुडे, मनोहर बागड यांच्यासह सभासद, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार राकेश शिरुडे यांनी मानले.