पाचोरा येथे कॉंग्रेस चे शेतकऱ्यांना न्यायासाठी “प्रशासन जागो आंदोलन”
पाचोरा – तालुक्यातील नेरी गावाच्या शेतकऱ्यांना प्रशासनाने दिलेले आश्वासन पूर्ण केले नाही म्हणून आज कॉंग्रेस कडुन प्रशासन जागो अनोख्या आंदोलनाने वेधल लक्ष
तालुक्यातील नेरी ते सार्वे गावाला जोडणारा रस्ता शासनाच्या दुर्लक्षामुळे शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी चा रस्ता पाण्यात गेला असता तहसील कार्यालया समोर अडीचशे शेतकऱ्यांनी कॉंग्रेस चे तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांच्या नेतृत्वाखाली आमरण उपोषण केले होते. यावेळी प्रशासनाने सबंधित फरशी साठी प्रस्ताव शासनाकडे करण्याचे आश्वासन दिले होते मात्र तब्बल तिन महिने उलटले तरी प्रशासनाने काहीच केले नाही म्हणून आज कॉंग्रेस ने प्रशासन जागो आंदोलन करुन पुन्हा आठवण म्हणून निवेदन दिले. तहसीलदार आवारात सकाळ पासून शेतकरी जमले होते. प्रशासनाने शेतकर्यांना न्याय देण्यासाठी जागो प्रशासन च्या घोषणांनी परिसर दणाणला यावेळी तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले यावेळी युवक जिल्हा उपाध्यक्ष ,विधानसभा उपाध्यक्ष प्रविण पाटील, ओबीसी तालुका अध्यक्ष इरफान मनियार, शरीफ शेख, शकंर सोनवणे, सुनील पाटील, विजय सुर्यवंशी, काशिनाथ अहिरे, नाना गढरी, इरफान पठाण, अनवर पठाण, सुरेश पाटील, किरण पाटील, दिलीप पाटील, याकुब पठाण शेनफडु पाटील, साहेबराव पाटील आदी उपस्थित होते. यापुढे प्रशासनाने गांभीर्या घेतले नाही तर सनदशीर मार्गाने वेगवेगळे आंदोलन करण्यात येणार आहे.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377