“अमृत महाआवास अभियान सर्वांसाठी घरे – 2024 अंतर्गत” जिल्हास्तरीय कार्यशाळा संपन्न !
बेघरांच्या स्वप्नातील “अमृत महाआवास योजना 100% यशस्वी करा – पालकमंत्री गुलाबराव पाटील
घरकुल योजना गतिमान व गुणवत्ता पूर्वक राबविण्याचे ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांचे आवाहन
जळगाव दि.17 – स्वत:चे पक्के घर असावे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. घरकुलाच्या माध्यमातुन हजारो ग्रामिण कुटुंबाचे हे स्वप्न पुर्ण होत आहे. बेघर आणि गरीब कुटुंबांना घरकुल बांधुन देण्याच्या महत्वाची जबाबदारी आपल्यावर आहे. जबाबदारी ही संधी समजुन प्रत्येकाने आत्मीयतेने काम केल्यास 100% उद्दिष्टय पूर्ण होईल. जल जीवन मिशन अंतर्गत जिल्ह्यातील नवीन पाणीपुरवठा योजना व रेट्रो फिटिंग ची एकूण१३५७ कोटी निधीच्या १३९४ योजनांना प्रशाकीय मान्यता देऊन १००% योजनांचे टेंडर काढण्यात आले आहे. घरकुल लाभार्थ्यांना तत्परतेने नळ जोडणी नोदणी करण्याची यंत्रणांनी दक्षता घेण्याचे आवाहन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले तर दीनदयाल उपाध्याय योजनेअंतर्गत जागा खरेदी अर्थसहाय्य यांची मर्यादा 50 हजारावरून एक लाख रुपये करण्याबाबत शासन स्तरावरून प्रयत्न सुरू आहेत तसेच बहुमजली इमारत चे प्रकल्प राबवून लाभार्थ्यांना घरकुल मिळवून देण्यात करिता शासकीय यंत्रणांनी प्रयत्नशील राहावे . कोणत्याही परिस्थितीत जिल्ह्याला दिलेले उद्दिष्ट पूर्ण करून योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून घरकुल बांधकामास गतिमान व गुणवत्ता पूर्वक राबविण्याचे आवाहन ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी केले अमृत महा आवास अभियान 2022-23 अंतर्गत नियोजन समिती सभागृहात आयोजित जिल्हास्तरीय कार्यशाळेत मार्गदर्शन करतांना मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले.
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्यात दिनांक 20 नोव्हेंबर 2022 ते 31 मार्च 2023 या कालावधीत “अमृत महा आवास अभियान 2022-23” राबविण्यात येत आहे त्या अनुषंगाने या जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले होते. कार्यशाळेच्या सुरुवातीला प्रकल्प संचालक मिलन कुटे यांनी”अमृत महा आवास अभियान 3.0 चे विस्तारित सादरीकरण केले. अडावद ता. चोपडा येथे गृहसंकुल उभारल्याचे नमूद केले. जिल्ह्यातील प्रतीक्षा यादीतील भूमिहीन लाभार्थ्यांची संख्या 18843 होती त्यापैकी तब्बल 13842 भूमिहीन लाभार्थ्यांना जागा उपलब्ध केल्याबद्दल मान्यवरांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले*
प्रास्ताविकात मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी ग्राम विकास विभागाच्या शासन निर्णयानुसार महा आवास योजना राबविण्याची उद्दिष्टये, त्या अंतर्गत राबवावयाचे उपक्रमांबाबत प्रस्ताविकातुन माहिती दिली. सर्वांसाठी घरे-2024 या शासनाच्या धोरणानुसार अभियान कालावधीत विविध उपक्रम राबवून केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण तसेच राज्य पुरस्कृत रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, पारधी आवास योजना अशा विविध ग्रामीण गृहनिर्माण योजनांची प्रभावी अंमलबजावणी बाबत माहिती विषद केली.
यांची होती उपस्थिती
जिल्हा नियोजन समिती सभागृहात आज संपन्न झालेल्या एक दिवशीय कार्यशाळेला आ. राजूमामा भोळे, आ.चंद्रकांत पाटील, आ. मंगेश चव्हाण, प्रभारी जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया, अति मुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब मोहन, जिल्हा ग्रामिण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक मिनल कुटे, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्नेहल कुडचे, प्रांताधिकारी विनय गोसावी, विभागीय कार्यालयाचे प्रतिनिधी ओवेस सिद्दीकी यांच्यासह जिल्ह्यातील तहसीलदार, गट विकास अधिकारीव विस्तार अधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन राजेंद्र इंगळे यांनी केले तर आभार कनिष्ठ लिपिक किरण बेडीसकर यांनी मानले.
जिल्हास्तरीय प्रधानमंत्री आवास योजनापुरस्कार वितरण
सर्वोत्कृष्ट तालुका पुरस्कार- प्रथम ,द्वितीय व तृतीय क्रमांक अनुक्रमे पारोळा, भडगाव व मुक्ताईनगर गटविकास अधिकारी
सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत पुरस्कार – प्रथम ,द्वितीय व तृतीय क्रमांक अनुक्रमे कुऱ्हे पानाचे ता. भुसावळ, सारोळे खुर्द ता. अमळनेर व मनवेल ता. यावल सरपंच व ग्रामसेवक
सर्वोत्कृष्ट क्लस्टर पुरस्कार – प्रथम , द्वितीय व तृतीय क्रमांक अनुक्रमे अडावद तालुका चोपडा,ऐनपूर खिरवड तालुका रावेर, तळेगाव तालुका जामनेर गटविकास अधिकारी
जिल्हास्तरीय राज्य पुरस्कृत आवास योजना पुरस्कार वितरण
सर्वोत्कृष्ट तालुका पुरस्कार – प्रथम ,द्वितीय व तृतीय क्रमांक अनुक्रमे जामनेर , एरंडोल व पाचोरा गटविकास अधिकारी
सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत पुरस्कार – प्रथम , द्वितीय व तृतीय क्रमांक अनुक्रमे करंजी ता.बोदवड , कासोदा ता. एरंडोल व करंज ता. जळगाव सरपंच व ग्रामसेवक
सर्वोत्कृष्ट क्लस्टर पुरस्कार – प्रथम , द्वितीय व तृतीय क्रमांक अनुक्रमे पाळधी खु. ता.धरणगाव , पहूर पेठ ता. जामनेर व बामरुड ता. पाचोरा सरपंच व ग्रामसेवक
गृहप्रवेश व प्रकाशन
अपंग व्यक्तींना चोरगाव तालुका धरणगाव येथील दिव्यांग बुधा सोनवणे, पाळधी खुर्द ता. धरणगाव ,कोकिळा लक्ष्मण परदेशी , मालोद तालुका यावल येथील महेरबान कुरबान तडवी यांन पालकमंत्री गुलाबराव पाटील व ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात घरकुलाची चावी देऊन गृहप्रवेश करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते”अमृत महा आवास अभियान यशोगाथाचे प्रकाशन करण्यात आले.
“अमृत महा आवास अभियान 2022-23” अंतर्गत राबवावयाचे उपक्रम :
भुमीहीन लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करुन देणे, घरकुलांना उद्दिष्टांप्रमाणे 100 टक्के मंजूरी देणे, मंजूर घरकुलांना सर्व हप्ते वेळेत वितरित करणे. सर्व मंजूर घरकुले भौतिकदृष्टया पुर्ण करणे, प्रलंबित घरकुले (Delayed Houses) पुर्ण करणे, ग्रामीण गवंडी प्रशिक्षण पुर्ण करणे, इंदिरा आवास योजनांतर्गत उर्वरित सर्व घरकुले पुर्ण करणे व क्षेत्र अधिकारी ॲप वापरणे,सामाजिक लेखापरिक्षण वेळेत करणे, शासकिय योजनांशी कृतीसंगम करणे, नाविन्यपुर्ण उपक्रम (इनोव्हेशेन्स/ बेस्ट प्राक्टिसेस) राबविणे.
” अभियानाची प्रमुख उद्दीष्ट्ये:
राज्यात गृहनिर्माण योजनांची प्रभावी अंमलबजावणीचे कामास गतिमान करणे, ग्रामीण गृह निर्माण योजनांमध्ये शासकिय यंत्रणा व पंचायत राज संस्थासोबत समाजातील सर्व घटक जसे-स्वयंसेवी संस्था (लॉयन्स क्लब, रोटरी क्लब, इ.), सहकारी संस्था, खाजगी संस्था, तंत्र शिक्षण संस्था, बँका, लोकप्रतिनिधी, लाभार्थी, ग्रामस्थ, इ.यांचा सक्रीय सहभाग वाढविणे, ग्रामीण गृहनिर्माण क्षेत्रातील भागधारकांची क्षमताबांधणी व जन-जागृतीद्वारे लोकचळवळ उभी करणे, योजनांमधील लाभार्थ्यांचे जिवनमान उंचावण्यासाठी शासनाच्या विविध योजनांचा कृतीसंगम (कन्वर्जेंस) घडवून आणणे, ग्रामीण गृहनिर्माण क्षेत्रामध्ये नाविन्यपुर्ण उपक्रम राबवून घरांचा दर्जा व गुणवत्ता वाढविणे.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377