
पाचोरा – मुंबई येथे याऊद्दिन खाटीक साहेब पाचोरा येथील रहिवासी यांची राज्य गुप्तचर विभागाच्या सहाय्यक आयुक्त पदी पदोन्नती झाल्या बद्दल सर्व समाजातून अभिनंदन करण्यात येत आहे.
याऊद्दिन खाटीक सरांचे मुळगाव त्यांचे जळगाव असुन पाचोरा हे मामाचे गाव आहे खाटीक सरांचे बालपण व प्राथमिक, माध्यमिक शिक्षण व ग्रॅज्युएशन पूर्ण पाचोऱ्याला झाले आहे. सरांचे मामा सलींम खाटीक आई व मावशी अतिशय गरीब कुटुंबातून परस्थिला तोंड देऊन मोठा संघर्ष करून भाजी पाल्याचा छोटा – मोठा धंदा व्यवसाय करून परिवाराला सांभाळून तसेच ,याऊद्दिन खाटीक सरांना शिक्षण घेण्यासाठी मोठ पाठबळ देऊन मोठ्या अधिकारी पदावरती बसवण्याचे काम या परिवाराने करून समजा पुढे आदर्श निर्माण केला आहे. तसेच याउद्दिन खाटीक सरांनी स्वत: मेहनत मुजुरीचे काम करून शिक्षण घेतले शिक्षण करत असताना 2007 ते 2010 मधे पाचोरा शहर व तालुक्यातील जळगाव जिल्ह्यातील गोरगरीब आईबापांच्या 12 वी पास झालेल्या मुलांना विद्यार्थ्यांना याऊद्दिन खाटीक सरांनी पाचोरा येथे कोंडवाडा गल्ली माळी समाज कार्यालयात पोलीस भरती क्लास घेतले,त्यावेळी 50 ते 52 मुलं महाराष्ट्र पोलीस दलामध्ये भरती झाले आहेत मुंबई येथे पाचोऱ्याचे पीएसआय PSI श्री वाल्मिक एकनाथ महाजन साहेब हे देखील याउद्दिन खाटीक सरांचेच विद्यार्थी आहेत, असे अनेक अधिकारी रेल्वे विभागातील पोलीस दलातील सरांच्या मार्गदर्शनामुळे झालेले आहेत.सरांच्या हातून गरीबांच्या मुलांचं भविष्य उज्ज्वल झाले आहे म्हणून जो दुसऱ्यांना मोठं करण्यासाठी मनापासून मेहनत घेत असतो तोच माणूस आपोआप मोठा होत असतो हे डोळ्यासमोरील जिवंत उदाहरण आहे याउद्दिन खाटीक सरांच्या माध्यमातून आपल्याला दिसून येत आहे. त्यांचें पंचक्रोशीतील सर्वांनी या यशाबद्दल अभिनंदन केले आहे.या बाबत श्री विठ्ठल महाजन यांनी सदर माहिती देतानाही आनंद व्यक्त केला.

खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377
बातमी लाईक करा,शेअर करा



