Pro- Active Abacus Ltd kolhapur आयोजित श्री समर्थ प्रोऍक्टिव्ह अबॅकस आणि वेदिक मॅथ क्लासेस चे घवघवीत यश
धुळे – धुळे येथे दि 17 डिसेंबर 2022 रोजी पार पडलेल्या प्रोऍक्टिव्ह अबॅकस नॅशनल रिजनल कॉम्पिटिशन (नॉर्थ झोन) 2022 -23 या स्पर्धेमध्ये श्री समर्थ प्रोऍक्टिव्ह अबॅकस पाचोरा चे 19 विद्यार्थी नाशिक विभागातून ट्रॉफी विनर ठरले. 6 मिनिटांत 100 गणिते सोडविणे असे स्पर्धेचे स्वरूप होते. या स्पर्धेत-क्लासमधील रेनबो लेव्हल मध्ये -वेदांत प्रकाश चौधरी ( क्रमांक- दुसरा),आर्यन अनिल सिनकर( क्रमांक -तिसरा), दिव्यांशु हरी चौधरी( क्रमांक- पाचवा), लेव्हल फर्स्ट न्यू मध्ये – सृष्टी प्रवीण ब्राह्मणे (क्रमांक- पहिला ),लेव्हल फर्स्ट मधून -वेदांत अमोल पाटील ( क्रमांक- दुसरा), ओवी वैभव दीक्षित ( क्रमांक तिसरा),तेजोनिधी शिवाजी सावंत ,मनस्वी प्रदीप राठोड ,संयम कमलेश सुराणा, लक्ष ललित जैन ( वरील चारही विद्यार्थ्यांचा क्रमांक- चौथा ), तनिष्का कपिल राऊल ( क्रमांक पाचवा) ,लीशा ललित जैन (क्रमांक -पाचवा), धैर्य संतोष जोशी( क्रमांक – पाचवा). लेव्हल टू मध्ये- कल्पेश चुडामन पुजारी( क्रमांक- दुसरा) *लेव्हल थ्री मध्ये – राधिका धरमसिंग परदेशी ( क्रमांक- पाचवा), हे विद्यार्थी विजेतेपदाचे मानकरी ठरले. तसेच क्लास मधील इतर विद्यार्थ्यांच्या बेस्ट परफॉर्मन्समुळे तसेच कमीत कमी वेळेत अधिक उदाहरणे बरोबर सोडवल्यामुळे आकर्षक मेडल्स देण्यात आले. सदर स्पर्धेत नाशिक विभागमधून 75 Abacus centre मधील 1050 विद्यार्थांनी भाग घेतला होता.
सदर कार्यक्रमास श्री राजेंद्र लोचानी,स्नेहा लोचानी ,श्री अजय मणियार,गिरीष करडे, सारिका करडे, तेजस्विनी सावंत डायरेक्टर प्रोऍक्टिव्ह अबॅकस मुंबई हे उपस्थित होते.
या विद्यार्थ्यांना श्री समर्थ प्रोऍक्टिव्ह अबॅकसचे मास्टर ट्रेनर *श्री रविंद्र पाटील सर व श्रीमती सपना शिंदे मॅडम यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले. हे दोघेही मास्टर ट्रेनर पाचोरा येथील नामांकित बुरहानी इंग्लीश मिडीयम स्कूल मध्ये 12 वर्षांपासून शिक्षक म्हणून कार्यरत आहेत.पालकांकडून त्यांचे कौतुक केले जात आहे तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377